कारवर 'आमदार' लोगो; मद्यधुंद तरुण पोलिसांच्या जाळ्यात; केसुर्डी हद्दीतील पुणे-सातारा महामार्गाच्या सर्व्हिस रोडवर कारवाई

by Team Satara Today | published on : 14 September 2026


सातारा : स्वतः आमदार नसतानाही कारवर 'महाराष्ट्र विधानसभा सदस्य' असा लोगो लावून आमदार असल्याचा आभास निर्माण केल्याप्रकरणी शिरवळ पोलिसांनी 35 वर्षीय तरुणावर गुन्हा दाखल केला. विशेष म्हणजे, कारवाईवेळी संबंधित तरुण मद्यप्राशन केलेल्या अवस्थेत असल्याचे पोलिसांनी सांगितले.
13 सप्टेंबर रोजी दुपारी सव्वाबाराच्या सुमारास केसुर्डी हद्दीतील पुणे-सातारा महामार्गाच्या सर्व्हिस रोडवर ही कारवाई झाली. पोलीस कॉन्स्टेबल अरविंद रामराव बार्‍हाळे यांच्या फिर्यादीवरून विशाल राजेंद्र यादव (रा. शिरवळ) याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला.
यादवच्या हुंडाई व्हेरना कारच्या पुढील व मागील बाजूस महाराष्ट्र विधानसभा सदस्य’ असा मजकूर असलेला लोगो लावण्यात आला होता. त्याखाली अशोकस्तंभ व आमदार’ असा उल्लेख होता. यादव किंवा त्याच्या कुटुंबातील कोणीही विधानसभा सदस्य नसल्याचे तपासात समोर आले. प्रकरणाचा तपास पोलीस हवालदार जाधव करीत आहेत.


लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
साताऱ्यात मॉर्निंग वॉक ठरला जीवघेणा; एसटीची धडक, वृद्धाच्या पायांवरून बस
पुढील बातमी
सातारा जिल्हा परिषदेमध्ये ३३४ प्राथमिक शिक्षकांना नियुक्ती आदेश - शिक्षण सभापती तेजस्विनी कदम यांची माहिती

संबंधित बातम्या