सातारा : वीजचोरीप्रकरणी आकारण्यात आलेले ६३ हजार ६६० रुपयांचे देयक भरल्यानंतरही सहा हजार रुपयांची तडजोड रक्कम न भरल्याने ग्राहकाविरुद्ध सातारा शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.
वैभव जगन्नाथ मदने यांच्या फिर्यादीनुसार तोफिक अय्युब शेख याच्यावर भारतीय विद्युत कायदा २००३ मधील कलम १३५ अंतर्गत कारवाई करण्यात आली. दि. १ फेब्रुवारी २०२५ ते १२ फेब्रुवारी २०२६ या कालावधीत केलेल्या तपासणीत वीजचोरी आढळून आली होती. त्यानंतर ६३ हजार ६६० रुपयांचे देयक आकारण्यात आले. संबंधित रक्कम दि. २२ एप्रिल २०२६ रोजी भरल्याचे नमूद आहे.मात्र, सहा हजार रुपयांची तडजोड रक्कम अद्याप जमा न केल्याने कायदेशीर कारवाई करण्यात आली. पोलीस हवालदार साबळे तपास करीत आहेत
वीजचोरीनंतर तडजोड रक्कम न भरल्याने ग्राहकाविरुद्ध सातारा शहर पोलिस ठाण्यात गुन्हा
by Team Satara Today | published on : 10 September 2026
लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा