सातारा : सरडे येथून अज्ञात चोरट्याने तीन शेळ्या चोरल्याची फिर्याद फलटण ग्रामीण पोलीस ठाण्यात नोंदविण्यात आली आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सरडे, ता. फलटण येथून घराशेजारील गोठ्यातून 60 हजार रुपये किंमतीच्या तीन उस्मानाबादी जातीच्या शेळ्या चोरीला गेल्याची फिर्याद भागवत सखाराम बेलदार (वय 70) यांनी नोंदवली असून फलटण ग्रामीण पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्याविरोधात गुन्हा दाखल झाला आहे.