नागपूरच्या जिहादी वृत्तींवर कठोर कारवाई व्हावी

हिंदुत्ववादी संघटनांचे जिल्हा प्रशासनाला निवेदन

by Team Satara Today | published on : 19 March 2025


सातारा : नागपूर येथे झालेल्या हिंसक कारवाया मधील दोषींवर कठोर कारवाई व्हावी अशा जिहादी प्रवृत्तींचा ताबडतोब बंदोबस्त केला जावा अशी मागणी विश्व हिंदू परिषद बजरंग दल यांचे वतीने करण्यात आली आहे. याबाबतचे निवेदन निवासी उपजिल्हाधिकारी नागेश पाटील यांना सादर करण्यात आले. 

यावेळी विजयसिंह बर्गे,अमित देशपांडे, जयदीप ठुसे, विलास बनकर, राहुल राठोड, भारतीय जनता पार्टीचे सरचिटणीस विठ्ठल बलशेठवार, शहराध्यक्ष विकास गोसावी विश्व हिंदू परिषदेचे विजय गाढवे उपस्थित होते.

या निवेदनात नमूद आहे की, नागपूर येथे मुस्लिम समाजातील काही गटांनी आगी लावून हिंसाचार केला ही घटना निंदनीय आहे. बजरंग दलातील कार्यकर्त्यांच्या घरावर हल्ला करण्यात आला अनेक हिंदू घरांना लक्ष करून महिलांना मारहाण करण्यात आली. या जिहादी वृत्तीच्या समाजकंटकांवर जास्तीत जास्त कठोर कारवाई करण्यात यावी. औरंगजेबाची कबर ज्या ठिकाणी आहे. त्या कबरीचा शासकीय खर्च बंद करावा तेथे कोणतीही सुधारणा केली जाऊ नये उलट औरंगजेबाला ज्यांनी पराभूत केले ते छत्रपती राजाराम महाराज, धनाजी जाधव संताजी घोरपडे यांचे वीर स्मारक उभे केले जावे, अशी मागणी या निवेदनात करण्यात आली आहे.


लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
सातारा जिल्ह्यात लाडक्या बहिणींचा संताप
पुढील बातमी
'काशिनाथाचं चांगभलं'च्या जयघोषात बावधनची बगाड यात्रा उत्साहात

संबंधित बातम्या