08:26pm | Sep 28, 2024 |
सातारा : सातारा जिल्ह्यातील दिव्यांग बांधवांच्या विविध मागण्यांसाठी सातारा जिल्हा दिव्यांग बांधव समितीच्या वतीने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या दरे, तालुका महाबळेश्वर येथील निवासस्थानासमोर दिव्यांग बांधवांनी दिव्यांग प्रेरणा सामाजिक संस्थेचे अध्यक्ष अजय पवार यांच्या नेतृत्वाखाली ठिय्या दिला. येथील सुरक्षारक्षकांनी दिव्यांग बांधवांना हटकले तरीही हे आंदोलन सुरूच राहिले.
सातारा जिल्ह्यातील दिव्यांग प्रेरणा सामाजिक संस्था गेल्या अनेक वर्षापासून वेगवेगळ्या मागण्यांसाठी शासनाकडे सातत्याने पाठपुरावा करत आहे. दिव्यांग बांधवांना विनाअट घरकुलासाठी जागा, प्रशासनातील अपंग पदांचा अनुशेष भरला जावा, दिव्यांग व्यक्तींना ई-रिक्षा वाटप व्हावे, महाराष्ट्रात एसटी प्रवास मोफत असावा, दिव्यांग बांधवांच्या स्वमालकीच्या घराचा शंभर टक्के घर फळा माफ करावा अशा विविध मागण्या त्यांनी केल्या आहेत. राज्य शासनाला सादर करण्यात आलेल्या निवेदनात सातार्याच्या पालकमंत्र्यांनी दिव्यांग बांधवांसाठी कोणतीही योजना राबवली नाही. स्वतःच्या आजोबांच्या स्मारकासाठी शिवतीर्थावर जागा व निधी त्वरित उपलब्ध करून घेतला. पण दिव्यांग बांधवांच्या पुनर्वसनासाठी निधी आणू शकले नाहीत, तसेच त्यांच्या पुनर्वसनांसह रोजगार निर्मितीसाठी कोणताही मेळावा आयोजित केला नाही, याचा सर्व दिव्यांग बांधवांनी यावेळी निषेध व्यक्त केला.
2 जुलै 2024 रोजी सातारा जिल्ह्यातील 24 दिव्यांग बांधवांनी विधानभवन मुंबई येथे आंदोलन केले होते. त्यावेळी पोलिसांनी त्यांना रोखले होते. अशा पोलिसांची चौकशी करण्यात यावी, अशीही मागणी त्यांनी केली आहे. सातार्यातील दिव्यांग झोन मधील व्यवसायिकांना इतरांकडून दमदाटी केली जाते. अशा विविध प्रकरणांची कसून चौकशी व्हावी अशा मागण्या यावेळी करण्यात आल्या. या मागण्यांकडे राज्य शासन वेळोवेळी दुर्लक्ष करत असल्याने सातारा जिल्हा दिव्यांग बांधव समितीच्या वतीने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या दरे येथील निवासस्थानासमोर तब्बल साडेचार तास ठिय्या देण्यात आला. येथील सुरक्षारक्षकांनी त्यांचे आंदोलन रोखण्याचा प्रयत्न केला. तरीसुद्धा दिव्यांग बांधव आंदोलनापासून हटले नाहीत
या आंदोलनात दिव्यांग प्रेरणा सामाजिक संस्थेचे अध्यक्ष अजय पवार, अविनाश कुलकर्णी, नामदेव इंगळे, शैलेंद्र बोर्डे, नितीन शिंदे, मानाजी लोहार, सतीश जाधव, प्रफुल्ल मस्के, आशिष चतुर, कृष्णा पवार आदींनी सहभाग घेतला.
पुसेगाव येथील यात्रे निमित्त वाहतुकीत बदल |
कंपनीच्या पार्किंग मधून दुचाकीची चोरी |
परळी येथे सुमारे तीन लाखांची घरफोडी |
रविवारी कॅबिनेट मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांचे जिल्ह्यात होणार जंगी स्वागत |
जिल्ह्यातील टपाल इमारतींच्या दुरुस्तींची मागणी |
सातारा पत्रकार संघाच्या अध्यक्षपदी विठ्ठल हेंद्रे बिनविरोध |
नागठाणेतील घाडगे हॉस्पिटलमधील नवजात शिशू मृत्यू प्रकरण |
बिल्डर्स असोसिएशनच्या - रचना प्रॉपर्टी एक्स्पो २०२४ बांधकाम विषयक प्रदर्शनाच्या मंडप उभारणीचा शुभारंभ |
दुष्काळ आणि रेल्वेच्या प्रश्नांवर आ. मनोजदादांनी सभागृहाचे लक्ष वेधले |
करिअर मेळाव्याचे 1 व 2 जानेवारी रोजी आयोजन |
साफसफाई व आरोग्यास धोकादायक क्षेत्रात काम करणाऱ्या पालकांच्या मुलांना शिष्यवृत्ती योजना लाभ घेण्याचे आवाहन |
'जिल्हा परिषद आपल्या दारी' उपक्रम लवकरच सुरु |
बॉम्बे रेस्टॉरंट परिसरातून दुचाकीची चोरी |
पाण्याच्या मोटरची चोरी |
राहत्या घरातून विवाहिता बेपत्ता |
सातारा पत्रकार संघाच्या अध्यक्षपदी विठ्ठल हेंद्रे बिनविरोध |
नागठाणेतील घाडगे हॉस्पिटलमधील नवजात शिशू मृत्यू प्रकरण |
बिल्डर्स असोसिएशनच्या - रचना प्रॉपर्टी एक्स्पो २०२४ बांधकाम विषयक प्रदर्शनाच्या मंडप उभारणीचा शुभारंभ |
दुष्काळ आणि रेल्वेच्या प्रश्नांवर आ. मनोजदादांनी सभागृहाचे लक्ष वेधले |
करिअर मेळाव्याचे 1 व 2 जानेवारी रोजी आयोजन |
साफसफाई व आरोग्यास धोकादायक क्षेत्रात काम करणाऱ्या पालकांच्या मुलांना शिष्यवृत्ती योजना लाभ घेण्याचे आवाहन |
'जिल्हा परिषद आपल्या दारी' उपक्रम लवकरच सुरु |
बॉम्बे रेस्टॉरंट परिसरातून दुचाकीची चोरी |
पाण्याच्या मोटरची चोरी |
राहत्या घरातून विवाहिता बेपत्ता |
लिफ्ट देण्याच्या बहाण्याने चोरी |
अपघातातील जखमीचा मृत्यू |
पुसेगाव येथे सुमारे सव्वा सात लाखांची घरफोडी |
गोडोली येथील भैरवनाथ मंदिर कलशारोहण सोहळ्यानिमित्त विविध कार्यक्रम |
श्रीरामकृष्ण सेवा मंडळात सोमवारी व्याख्यान |