थकीत कर्ज एकरक्कमी भरणा करणाऱ्यांना मिळणार 50 टक्के सवलत

इतर मागासवर्गीय वित्त आणि महामंडळाची योजना

by Team Satara Today | published on : 11 September 2025


सातारा : महाराष्ट्र राज्य इतर मागासवर्गीय वित्त आणि महामंडळाच्या थकीत कर्ज प्रकरणात संपूर्ण थकीत कर्ज रक्कमेचा एकरक्कमी भरणा करणा-या लाभार्थीस थकीत व्याज रक्कमेत 50 टक्के सवलत देण्याबाबतची एकरक्कमी परतावा (OTS) योजना ३१ मार्च २०२६ पर्यंत राबविण्यात येणार आहे.

तरी महामंडळाच्या थकबाकीदार लाभार्थीनी या योजनेचा लाभ घेऊन कर्जमुक्त व्हावे. अधिक माहितीसाठी महामंडळाच्या सातारा जिल्हा कार्यालयाशी किंवा ०२१६२-२९५१८४  दूरध्वनी क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हा व्यवस्थापक पी.एन. दळवी, यांनी केलेले आहे.



लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
राज्यात PUC नसेल तर इंधनही मिळणार नाही
पुढील बातमी
नेपाळमध्ये अडकलेल्या महाराष्ट्रातील पर्यटकांना सुखरूप परत आणणार

संबंधित बातम्या