सातारा : जिल्हा रुग्णालयातील कर्मचारी मद्यप्राशन केलेल्या अवस्थेत आढळल्याने त्याच्या विरोधात सातारा शहर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, सातारा जिल्हा शासकीय रुग्णालयात (सिव्हील) विश्वनाथ विनायक घमरे (वय 39, रा. सातारा) हा कर्मचारी मद्यप्राशन केलेल्या अवस्थेत सापडला. यावरुन डॉ.तेजस पठाडे यांनी सातारा शहर पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. दि. 4 मार्च रोजी ही घटना समोर आली. सिव्हीलचे वैद्यकीय पथक पाहणी करत असताना घमरे हा विश्रामकक्षात झोपला होता. त्याची चौकशी केली असता तो मद्यप्राशन करुन ’टुंग’ असल्याचे समोर आले.