वाई-पाचगणी मार्गावरील पसरणी घाटात भीषण अपघात

गाडी 200 फूट दरीत कोसळली; 4 जण गंभीर जखमी

by Team Satara Today | published on : 13 March 2025


सातारा : सातारा जिल्ह्यातील वाई-पाचगणी रस्त्यावरील पसरणी घाटात आज भीषण अपघात घडला. बुवासाहेब मंदिर परिसराजवळ गाडी दरीत कोसळल्याने चार जण गंभीर जखमी झाले आहेत. महाबळेश्वर मार्गे पुण्याला जात असताना, कोकणातून आलेले एक कुटुंब वाई-पाचगणी मार्गावर पसरणी घाटात बुवासाहेब मंदिरापासून शंभर मीटर अंतरावर असलेल्या वळणावर चालकाने गाडीचं नियंत्रण गमावल्याने गाडी 200 फूट खोल दरीत कोसळली.

गाडीतील जखमींमध्ये बजरंग पर्वत, काळभोर लोणी, वैभव काळभोर, सौरभ काळभोर, आणि अक्षय काळभोर या सर्वांचा समावेश आहे. हे सर्वजण दोन दिवसांपूर्वी कोकणात गेले होते आणि महाबळेश्वर मार्गे पुण्याला परत येत असताना या अपघातात ते जखमी झाले.

घटनास्थळी पोलीस आणि शिवेंद्रराजे रेस्क्यू टीम तत्काळ दाखल झाले असून, जखमींना तातडीने रुग्णालयात हलविण्यात आले आहे. अपघाताची माहिती मिळताच स्थानिक प्रशासन आणि रेस्क्यू टीम्स घटनास्थळी पोहोचली आणि मदत कार्य सुरू केले.

तज्ज्ञांच्या मते, या मार्गावर अपघातांची संख्या वाढलेली आहे, त्यामुळे सुरक्षा उपायांची आवश्यकता अधिकच वाढली आहे. स्थानिक प्रशासनाने या घटनेची गंभीर दखल घेतली असून, पुढील तपास सुरू आहे.




लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
अपघात प्रकरणी अज्ञात दुचाकी चालकावर गुन्हा
पुढील बातमी
भाजी मंडईतून मोबाईलची चोरी

संबंधित बातम्या