सातारा : चक्री जुगार प्रकरणी सातारा तालुका पोलिसांनी एकावर कारवाई केली आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, दि. 26 रोजी जकातवाडी गावच्या हद्दीतील बोगदा ते कुरनेश्वर रस्त्यावरील आडोशाला ओमकार नारायण नलवडे रा. मंगळवार पेठ, सातारा हा जुगार घेताना आढळून आला. त्याच्यावर कारवाई करून त्याच्याकडून संगणक, रोख रक्कम व जुगाराचे साहित्य असा 17 हजार 900 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.