अनुसूचित जाती-जमाती प्रवर्गातील शेतकऱ्यांनी सूक्ष्म सिंचन योजनेचा लाभ घेण्याचे जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी श्रीमती फरांदे यांचे आवाहन

by Team Satara Today | published on : 16 September 2026


सातारा  : केंद्र सरकारच्या राष्ट्रीय कृषी विकास योजनेत प्रति थेंब अधिक पिकअंतर्गत यंदाचे वर्ष २०२६-२७ मध्ये अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमाती प्रवर्गातील शेतक-यांसाठी सूक्ष्म सिंचनाचा अनुदानाचा निधी मंजूर आहे. त्यासाठी इच्छुक शेतकऱ्यांनी महाडीबीटी या संकेतस्थळावर भेट देऊन १५ ऑक्टोबर २०२६ पूर्वी अर्ज सादर करावे, असे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी  भाग्यश्री फरांदे यांनी केले आहे.
शेतकऱ्यांनी अर्ज सादर करताना सर्व माहिती अचूक भरणे अपेक्षित आहे. ज्याद्वारे अर्ज मंजूर होण्याची प्रक्रिया अधिक सुलभ होईल. योजनेचा लाभ एका शेतकऱ्याला कमाल पाच हेक्टर क्षेत्र मर्यादत दिला जातो. शेतकऱ्यांनी राज्य सरकारच्या महाडीबीटी पोर्टलवर नोंदणी करावेत.    अर्जासाठी https:///mahadbt.maharashtra.gov.in/farmer/agrilogin या संकेतस्थळावर भेट दयावी. या पोर्टलवर प्रथम अर्ज करणाऱ्यास प्रथम प्राधान्य या तत्त्वावर अर्ज स्वीकारले जाणार आहेत. अर्ज करताना शेतकऱ्यांकडे अॅग्रिस्टॅक फार्मर आयडी हा ओळख पडताळणीसाठी आवश्यक शासकीय कागदपत्रे, बँक पासबुक  आणि जातीचा दाखला असणे आवश्यक आहे.   इच्छुक शेतकऱ्यांनी आपल्या परिसरातील आपले सरकार सेवा केंद्र, कृषी विभागाचे अधिकारी किंवा तालुका कृषी अधिकारी कार्यालयाशी थेट संपर्क साधावा, असेही आवाहन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी श्रीमती फरांदे यांनी केले आहे.


लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
प्रारूप मतदार यादीत नाव समाविष्ट करण्यासाठी १९, २०, २६ व २७ सप्टेंबरला विशेष शिबिरांचा लाभ घ्या - उपजिल्हा निवडणूक अधिकारी भगवान कांबळे
पुढील बातमी
पंडीत दीनदयाल उपाध्याय रोजगार महाकुंभ मेळाव्यांत रोजगाराच्या संधी देणाऱ्या आस्थापनांनी सहभागी व्हावे - जिल्हाधिकारी संतोष पाटील

संबंधित बातम्या