महामार्गावरील भरतगाववाडी गावच्या हद्दीत ट्रक चालकाला चाकूचा धाक दाखवून जबरी चोरी; अज्ञात चोरट्यांवर गुन्हा

by Team Satara Today | published on : 02 July 2026


सातारा : बेंगलोर-मुंबई राष्ट्रीय महामार्गावरील भरतगाववाडी गावच्या हद्दीत एका ट्रक चालकाला शस्त्रांचा धाक दाखवून लुटल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. याप्रकरणी सातारा शहर पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ट्रकचालक भीमाप्पा विठ्ठल मालांगी (रा. गोकाक, जि. बेळगाव, कर्नाटक) हे 30 जून 2026 रोजी पहाटेच्या सुमारास महामार्गावरून जात होते. पहाटे पावणेतीन वाजण्याच्या सुमारास भरतगाववाडी पूल ओलंडल्यावर त्यांनी आपला ट्रक रस्त्याच्या बाजूला थांबवला. ते ट्रकाची पाहणी करत असतानाच, तीन दुचाकींवरून येऊन 5 ते 6 अनोळखी व्यक्तींनी त्यांना घेरले.

या चोरट्यांनी चालकाला शिवीगाळ करत कोयता आणि चाकूचा धाक दाखवून चालकाला मारहाण करत त्यांच्या खिशातील मोबाईल फोन आणि रोख रक्कम असा सुमारे 12 हजार 500 रुपयांचा मुद्देमाल जबरदस्तीने हिसकावून घेत तिथून पोबारा केला. पोलीस उपनिरीक्षक प्रशांत तुळसे या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत.


लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
जुन्या वादातून एकास कोयता व लाकडी दांडक्याने मारहाण; दोन जणांविरोधात गुन्हा दाखल
पुढील बातमी
नाविण्यपूर्ण उपक्रमांद्वारे जादूटोणा विरोधी कायद्याची प्रचार, प्रसिद्धी करा - विभागीय आयुक्त शीतल तेली

संबंधित बातम्या