नवी दिल्ली : देशभरात आज रक्षाबंधन सण साजरा करण्यात येत आहे. या दिवशी एक अद्भूत घटना अंतराळात घडणार आहे. अंतराळात चंद्राची अनोखे दृश्य दिसणार आहे. चंद्र आज 30% अधिक प्रकाशमान असणार आहे. तसेच 14% मोठा दिसणार आहे. म्हणजे अंतराळात आज मून नाही तर सुपरमून दिसणार आहे. आज निघणाऱ्या चंद्रास ब्लू सुपरमून किंवा स्टरजियॉन सुपरमून म्हणतात. ब्लू सुपरमून आज भारतात दिसणार आहे.
यंदा असे आले सुपरमून :
सुपरमून रात्री 11.55 वाजता अधिक प्रकाशमान आणि मोठा दिसणार आहे. सुपरमून दोन प्रकारचे असतात. पहिल्या प्रकारात दर महिन्याला दिसणारा सुपरमून येतो. म्हणजेच यामध्ये दर दुसऱ्या आठवड्यात दिसणारा चंद्र यामध्ये येतो. दुसरा प्रकार सीजनल सुपरमून आहे. सीजनलमध्ये पहिला पूर्ण चंद्र 22 जून, दुसरा 21 जुलै तिसरा 19 ऑगस्ट रोजी आहे. म्हणजेच हा तिसरा ब्लू मून आहे. त्यानंतर 18 सप्टेंबर रोजी हार्वेस्ट मून तर 22 सप्टेंबर रोजी इक्वीनॉक्स दिसणार आहे.
सुपरमून कसे पाहू शकतो?
नासानुसार, सीजनल ब्लू मून दर दोन ते तीन वर्षांनी एकदा येतो. यापूर्वी ऑक्टोंबर 2020 मध्ये, ऑगस्ट 2021 मध्ये आला होता. आता 2024 मध्ये हा सुपरमून येत आहे. त्यानंतर मे 2027 मध्ये हा सुपरमून दिसणार आहे. हा सुपरमून तुम्ही तुमच्या घराच्या छतावरुन सहज पाहू शकतात. अधिक चांगल्या पद्धतीने त्याचे निरीक्षण करायचे असेल तर दुर्बिणचा वापर करु शकाल.
काय असतो सुपरमून?
जेव्हा चंद्र पृथ्वीच्या जवळ येतो, तेव्हा त्याचा आकार मोठा दिसतो. हा आकार 12 ते 14 टक्के मोठा होतो. साधारणपणे चंद्राचे पृथ्वीपासूनचे अंतर 406,300 km आहे. परंतु चंद्र जेव्हा पृथ्वीच्या जवळ येतो, तेव्हा त्याचे अंतर 356,700 किलोमीटर होते. त्यावेळी चंद्र मोठा दिसतो. यामुळे त्याला सुपरमून म्हटले जाते. या वेळी चंद्र आपल्या कक्षेत फिरत असताना पृथ्वीच्या जवळ येतो. चंद्र हा पृथ्वीभोवती गोलाकार कक्षेत फिरत नाही. अंडाकार कक्षेत चंद्राचे हे भ्रमण सुरु असते. यामुळे पृथ्वीच्या जवळ येणे निश्चित असते. चंद्र पृथ्वीच्या जवळ आल्यानंतर त्याची चमक वाढून जाते. हा सर्व प्रकारास सुपरमून म्हटले जाते.
सुपर ब्लू मून कधी दिसणार?
संशोधकांच्या मते, संपूर्ण जगात ब्लू मून दिसणार आहे. मात्र, प्रत्येक ठिकाणी हे पाहण्याची वेळ वेगवेगळी असू शकते. 19 ऑगस्ट आणि 20 ऑगस्टला सुद्धा पाहता येईल. भारतात 19 ऑगस्ट रोजी रात्रीपासून ते 20 ऑगस्टच्या सूर्योदयापूर्वी आपण पाहू शकतो. 19 ऑगस्टला संध्याकाळी 6.56 वाजता चंद्रोदय होईल आणि रात्री 11.55 वाजता चंद्र सर्वात मोठा आणि तेजस्वी दिसणार आहे. तज्ज्ञांच्या मते, सुपर ब्लू मून पाहण्यासाठी आकाश निरभ्र आणि हवेचे प्रदूषण कमी असेल अशी जागा निवडायला हवी.
पुसेगाव येथील यात्रे निमित्त वाहतुकीत बदल |
कंपनीच्या पार्किंग मधून दुचाकीची चोरी |
परळी येथे सुमारे तीन लाखांची घरफोडी |
रविवारी कॅबिनेट मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांचे जिल्ह्यात होणार जंगी स्वागत |
जिल्ह्यातील टपाल इमारतींच्या दुरुस्तींची मागणी |
सातारा पत्रकार संघाच्या अध्यक्षपदी विठ्ठल हेंद्रे बिनविरोध |
नागठाणेतील घाडगे हॉस्पिटलमधील नवजात शिशू मृत्यू प्रकरण |
बिल्डर्स असोसिएशनच्या - रचना प्रॉपर्टी एक्स्पो २०२४ बांधकाम विषयक प्रदर्शनाच्या मंडप उभारणीचा शुभारंभ |
दुष्काळ आणि रेल्वेच्या प्रश्नांवर आ. मनोजदादांनी सभागृहाचे लक्ष वेधले |
करिअर मेळाव्याचे 1 व 2 जानेवारी रोजी आयोजन |
साफसफाई व आरोग्यास धोकादायक क्षेत्रात काम करणाऱ्या पालकांच्या मुलांना शिष्यवृत्ती योजना लाभ घेण्याचे आवाहन |
'जिल्हा परिषद आपल्या दारी' उपक्रम लवकरच सुरु |
बॉम्बे रेस्टॉरंट परिसरातून दुचाकीची चोरी |
पाण्याच्या मोटरची चोरी |
राहत्या घरातून विवाहिता बेपत्ता |
सातारा पत्रकार संघाच्या अध्यक्षपदी विठ्ठल हेंद्रे बिनविरोध |
नागठाणेतील घाडगे हॉस्पिटलमधील नवजात शिशू मृत्यू प्रकरण |
बिल्डर्स असोसिएशनच्या - रचना प्रॉपर्टी एक्स्पो २०२४ बांधकाम विषयक प्रदर्शनाच्या मंडप उभारणीचा शुभारंभ |
दुष्काळ आणि रेल्वेच्या प्रश्नांवर आ. मनोजदादांनी सभागृहाचे लक्ष वेधले |
करिअर मेळाव्याचे 1 व 2 जानेवारी रोजी आयोजन |
साफसफाई व आरोग्यास धोकादायक क्षेत्रात काम करणाऱ्या पालकांच्या मुलांना शिष्यवृत्ती योजना लाभ घेण्याचे आवाहन |
'जिल्हा परिषद आपल्या दारी' उपक्रम लवकरच सुरु |
बॉम्बे रेस्टॉरंट परिसरातून दुचाकीची चोरी |
पाण्याच्या मोटरची चोरी |
राहत्या घरातून विवाहिता बेपत्ता |
लिफ्ट देण्याच्या बहाण्याने चोरी |
अपघातातील जखमीचा मृत्यू |
पुसेगाव येथे सुमारे सव्वा सात लाखांची घरफोडी |
गोडोली येथील भैरवनाथ मंदिर कलशारोहण सोहळ्यानिमित्त विविध कार्यक्रम |
श्रीरामकृष्ण सेवा मंडळात सोमवारी व्याख्यान |