सातारा : सुमारे साडेचार लाखांच्या टेलीकॉम साहित्याची चोरी केल्याप्रकरणी अज्ञात चोरट्यांविरोधात सातारा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, सातारा एमआयडीसी येथून अज्ञात चोरट्यांनी 4 लाख 45 हजार रुपये किंमतीचे जिओ टेलीकॉमचे साहित्य चोरुन नेले. याप्रकरणी अनिल धर्मराज संकपाळ (वय 53, रा. गोडोली, सातारा) यांनी सातारा शहर पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. ही घटना दि. 17 ते 24 फेब्रुवारी यादरम्यान घडली आहे.