वानरांचा उपद्रवाने मांढरदेवीकर नागरिक त्रस्त; वानरांचा बंदोबस्त करण्याची मागणी

by Team Satara Today | published on : 27 September 2026


मांढरदेव : सध्या वानरांचा उपद्रवाने  मांढरदेव येथील नागरिक त्रस्त झाले असून वानरांनी केलेल्या हल्ल्यात आतापर्यंत चारजण जखमी झाले आहेत.  जंगली प्राण्यांच्या या प्राण घातक हल्ल्यामुळे नागरिकांच्या जीवितास धोका निर्माण होऊ शकतो. म्हणून त्यांचा वेळेत बंदोबस्त करण्याची मागणी ग्रामस्थ तसेच भाविकांकडून केली जात आहे.
याबाबत अधिक माहिती अशी, वाई तालुक्यातील प्रसिद्ध तीर्थक्षेत्र मांढरदेव हे ऊंच डोंगरावर वसलेले असून या ठिकाणी करवंदीची,जांभळाची तसेच इतर वृक्षांची झाडी पाहवयास मिळते.येथे जाण्यासाठी घाट रस्त्याने जावे लागते. दाट झाडी असल्याने घाटामध्ये व इतर ठिकाणी अनेक जंगली प्राण्यांचा वावर असतो. त्यामध्ये वानरांचे दर्शन जास्त प्रमाणात होत असते.
देवीच्या दर्शनासाठी येणारे भाविक दर्शन झाल्यानंतर प्राण्यांवरील प्रेमामुळे किंवा वानरांना पाहिल्या नंतर त्यांच्या लहान मुलींच्या हट्टापाई येथे असणाऱ्या प्राण्यांना खाऊ घालतात. त्यामुळे येथे असणाऱ्या प्राण्यांना माणसापासून भीती वाटत नसून ते माणसामध्ये मिसळून राहत असतात.परंतु त्यासोबत ते कधी कधी माणसांवर हल्ला देखील करत असतात.
मागील आठवड्यामध्ये यातील काही प्राण्यांनी गावातील दोन लोकांवर हल्ला केला असून दोन्हीही लोक गंभीररित्या जखमी झाले आहेत. त्यातील ज्ञानेश्वर विनायक मांढरे हे एक वर्षाच्या बाळ समर्थ विकास मांढरे गाडीवरून जात असताना.वानराने त्यांच्या दुचाकी गाडीवर अचानक उडी मारल्यामुळे ते त्या बाळासहीत खाली पडले. त्यात त्यांच्या डोक्याला,हाताला, पायाला व लहान बाळाच्या डोक्याला मोठ्या प्रमाणात दुखापत झाली.त्यांच्यावर मांढरदेव येथील खासगी रुग्णालयात उपचार करून पुढील उपचारासाठी सातारला नेण्यात आले. ही  घटना ताजी असतानाच दुसऱ्याच दिवशी यशवंत खाशाबा मांढरे या ७० वर्षाचा वृद्धावर चढणीच्या पायरावरील मारुती मंदिर या ठिकाणी हल्ला केला. त्यात देखील त्या इसमाच्या डोक्याला जबर जखम झाली असून रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
      


लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
साताऱ्यात गणेशोत्सवावेळी दोन गटात जोरदार राडा; 21 जणांवर परस्परविरोधी तक्रारी;
पुढील बातमी
खरीप पिकांचे तातडीने पंचनामे करण्याचे जिल्हाधिकारी संतोष पाटील यांचे निर्देश; महसूल-कृषी-पंचायत यंत्रणेला संयुक्त सर्वेक्षणाच्या सूचना

संबंधित बातम्या