गजवडी येथे दुकानासमोरून दुचाकी चोरीस

by Team Satara Today | published on : 09 May 2026


सातारा : तालुक्यातील गजवडी गावच्या हद्दीत परळी रोडवरील सिद्धिविनायक प्लंबिंग हार्डवेअर दुकानासमोर उभी केलेली दुचाकी अज्ञात चोरट्याने लंपास केल्याची घटना घडली आहे.

याप्रकरणी तालुका पोलिस ठाण्यात अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी उदय जांभळे यांचे काका जगन्नाथ सदाशिव जांभळे (रा. अतित, ता. जि. सातारा) यांच्या मालकीची हिरो होंडा कंपनीची काळ्या रंगाची एमएच-११-बीबी-३५५९ क्रमांकाची दुचाकी परळी रोडवरील सिद्धिविनायक प्लंबिंग हार्डवेअर दुकानासमोर उभी करण्यात आली होती. तिची अंदाजे किंमत २७ हजार रुपये आहे.

दरम्यान, अज्ञात इसमाने फिर्यादी यांच्या संमतीशिवाय सदर दुचाकी लबाडीने चोरी करून नेल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे. ही घटना दिनांक ५ रोजी सायंकाळच्या सुमारास घडली.या प्रकरणी तालुका पोलिस ठाण्यात अज्ञात चोरट्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास महिला पोलीस हवालदार शिर्के करीत आहेत.


लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
नागठाणे येथे जुगार अड्ड्यावर पोलिसांचा छापा; रोख रक्कम व जुगाराचे साहित्य जप्त
पुढील बातमी
कोरेगाव येथील डी. पी. भोसले कॉलेजात सिंथेटिक ट्रॅक उभारा - एक्स डीपीयन्स तथा माजी विद्यार्थी संघटनेचे शरद पवार यांना साकडे

संबंधित बातम्या