सार्वजनिक शांततेचा भंग केल्याप्रकरणी सात जणांवर गुन्हा

by Team Satara Today | published on : 30 June 2025


सातारा : सार्वजनिक शांततेचा भंग केल्याप्रकरणी सात जणांविरोधात सातारा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला आहे.

याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, दि. 29 रोजी संध्याकाळी साडेसहा वाजता सुमारास सातारा शहर पोलीस ठाणे हद्दीत आणि प्रतापसिंह नगर येथील चौकात सागर रामा ताकपिरे, विवेक रामा ताकपिरे, दिनेश रामा ताकपिरे, कुणाल लक्ष्मण जोगदंड, जीवन महादेव गायकवाड, सुनील सुभाष गायकवाड आणि रोहन संतोष चांदणे सर्व रा. प्रतापसिंह नगर, सातारा हे एकमेकांसोबत मारामारी तसेच आरडाओरडा करून सार्वजनिक शांततेचा भंग करताना आढळून आले. याबाबत सातारा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास पोलीस हवालदार जाधव करीत आहेत.


लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
शाहूनगर मधील नागरिकांचा महाराष्ट्र जीवन प्राधिकरणावर मोर्चा
पुढील बातमी
दुकानातून सुमारे 65 हजारांच्या साहित्याची चोरी

संबंधित बातम्या