सातारा : राहत्या घरातून एक विवाहिता बेपत्ता झाल्याची फिर्याद शाहूपुरी पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आली आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, दि. 8 रोजी दुपारी दीड वाजण्याच्या सुमारास सातारा शहर परिसरात राहणारी एक 28 वर्षीय विवाहिता घरातून अंगणवाडी मीटिंगसाठी गोडोली येथे जाते, असे सांगून निघून गेली आहे. अधिक तपास पोलीस हवालदार बोडरे करीत आहेत.