सातारा : येथील जिल्हा बालविकास समिती संचालित गोकूळ प्राथमिक शाळेत इयत्ता सातवीच्या विद्यार्थीचा निरोप समारंभ उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाला. या कार्यक्रमासाठी प्रदिप ढाणे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. तसेच संस्थेच्या अध्यक्षा शंकुतला कासट, उपाध्यक्ष पुरुषोत्तम गोडसे, सचिव विनोद कुलकर्णी, सर्व सदस्य ,मुख्याध्यापक, बालवाडी प्रमुख, सर्व शिक्षक उपस्थित होते.
दीपप्रज्वलन व सरस्वती पूजनाने कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. प्रास्ताविक संजय सावंत यांनी करून कार्यक्रमाचे उद्दिष्ट स्पष्ट केले. प्रमुख पाहुण्यांनी मुलांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देऊन जीवनात प्रामाणिकपणा शिस्त व मेहनत यांचे महत्त्व पटवून दिले. सर्व मान्यवरांनी मुलांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.शाळेतील पदवीधर शिक्षिका वर्षालता धनावडे, रामदास चौगुले, सुवर्णा काळे, शशिकांत चव्हाण, संध्या महामूलकर, निलम पाटील, जयश्री घेवदे यांनी मुलांना उज्ज्वल भविष्यासाठी मार्गदर्शन केले. सातवीतील विद्यार्थ्यांनी आपल्या मनोगतातून शाळेतील आठवणींना उजाळा दिला. मुलांना प्रशस्तीपत्र देऊन गौरविण्यात आले.
कार्यक्रमामध्ये प्रमुख पाहुण्यांची ओळख रामदास चौगुले यांनी केली. वर्षालता धनावडे यांनी सूत्रसंचलन केले तर शाळेच्या मुख्याध्यापिका मिनल खटावकर यांनी मुलांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देऊन आभार मानले. यावेळी पालकांची मोठ्या प्रमाणात उपस्थिती होती.कार्यक्रम यशस्वी पार पडण्यासाठी सुनिता निकम व फुलाबाई अडागळे यांचे सहकार्य केले.