सातारा : बोरगाव पोलीस ठाण्याअंतर्गत गणेशोत्सव काळात दि. ७ ते दि. १८ सप्टेंबर अखेर १० जणांना हद्दपार करण्यात आले आहे. त्याबाबतचे आदेश सातारा तहसीलदारांनी काढले आहेत.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, बाजीराव बबन कमाने (सासपडे, ता. सातारा), पांडुरंग श्रीरंक मोहिते (आंबेवाडी, ता. सातारा), अंकुश शिवाजी सावेकर (वेणेगाव, ता. सातारा), चंद्रकांत दिनकर सावंत (वेणेगाव), हरिदास रामचंद्र राठोड (अपशिंगे, ता. सातारा), काकासाहेब राजाराम सासणे (अतित, ता. सातारा), योगेश दिलीप अवघडे (सासपडे, ता. सातारा), वैभव मोहन निजम (कुमठे, ता. सातारा), तानाजी मुरलीधर कमाने (सासपडे), शकीला गुलाब मुलाणी (टिटवेवाडी-देशमुखनगर, ता. सातारा) यांना बोरगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीतून हद्दपार करण्यात आले आहे.