राजवाडा परिसरातून दुचाकीची चोरी

by Team Satara Today | published on : 02 June 2025


सातारा : राजवाडा परिसरातून दुचाकीची अज्ञात चोरट्याने चोरी केल्याची फिर्याद शाहूपुरी पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आली आहे.

याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, राजवाडा परिसरातून अज्ञात चोरट्याने एमएच 11 डीके 5322 या क्रमांकाची दुचाकी चोरुन नेली. ही घटना दि. 14 मे ते 30 मे या दरम्यान घडली आहे. याप्रकरणी विजय बबन गुरव (वय 38, रा. राजवाडा परिसर, सातारा) यांनी शाहूपुरी पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. अधिक तपास पोलीस हवालदार बनकर करीत आहेत.


लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
राहत्या घरातून युवती बेपत्ता
पुढील बातमी
अल्पवयीन मुलाला मारहाण प्रकरणी चारजणांवर गुन्हा

संबंधित बातम्या