सातारा : मसाप, पुणे शाहुपुरी शाखा आणि सातारा नगरपालिकेच्यावतीने दरवर्षी महाराष्ट्रातील पहिला मराठी भाषा पंधरवडा साजरा केला जातो. यंदा त्याचे १४ वे वर्ष असून त्यानिमित्त नवोदित आणि उदयोन्मुख कवींसाठी स्वरचित मराठी काव्य लेखन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. या स्पर्धेसाठी कविता पाठवण्याची अंतिम मुदत ३१ जानेवारी २०२५ असल्याची माहिती मसाप, पुणे शाहुपुरी शाखेचे अध्यक्ष नंदकुमार सावंत यांनी प्रसिध्दीपत्रकाव्दारे दिली आहे.
पत्रकात, मराठी काव्य लेखन स्पर्धा नवोदित आणि उदयोन्मुख कवींसाठी आहे. कविता स्वरचित, अनुवाद न केलेली आणि कोठेही प्रसिध्द न झालेली असावी. स्पर्धकांनी कवितेसोबत पत्ता, फोन नंबर पाठवण आवश्यक आहे. कविता सचिन सावंत ९८६०५२२७०६ या व्हॉट्सॲप नंबरला पाठवावी. सर्वोत्कृष्ट तीन कवितांना प्रत्येकी २ हजार तर उत्तेजनार्थ दोन कवितांना प्रत्येकी १ हजार रुपये बक्षीस देण्यात येईल. कविता पाठवण्याची अंतिम मुदत ३१ जानेवारी २०२५ आहे.