सातारा : पाण्यात बुडल्याने एकाचा मृत्यू झाल्याची नोंद सातारा तालुका पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, दि. 1 रोजी देगाव, ता. सातारा येथील पाझर तलावात मंगेश गोविंद साळुंखे रा. देगाव, ता. सातारा हे पोहण्यासाठी गेले असता तलावातील पाण्यात बुडून त्यांचा मृत्यू झाला आहे. याबाबतची नोंद सातारा तालुका पोलीस ठाण्यात करण्यात आली असून अधिक तपास पोलीस हवालदार राऊत करीत आहेत.
लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा