सातारा : येथील श्यामसुंदरी चारिटेबल अँड रिलीजस सोसायटीच्या के.एस.डी. शानभाग विद्यालय व जुनिअर कॉलेजच्या कु. सई राहुल ढाणे, ई. .8 वी ,ब हिने योगासना स्पर्धेमध्ये यश संपादन केले.
दि.18 व 19 जानेवारी 2025 रोजी संपन्न झालेल्या ऑल इंडिया योगा कल्चर फेडरेशन कडून घेण्यात आलेल्या पश्चिम बंगाल (मिदणापूर) येथील राष्ट्रीय योगासन स्पर्धेमध्ये 8 वी ब हिने 14 वर्षाखालील मुलींच्या वयोगटामध्ये रिदमिक योगासना व ट्रॅडिशनल योगासना स्पर्धेमध्ये यश संपादन केले. तसेच व्हिएतनाम येथे होणाऱ्या इंटरनॅशनल योगासन चॅम्पियनशिप स्पर्धेसाठी ती पात्र झाली आहे. तिला राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त योगाचार्य सौ. सुवर्णा सुहास वाघमारे यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले.
या यशाबद्दल महाविद्यालयाच्या संस्थापक व ज्येष्ठ क्रीडा मार्गदर्शक रमेश शानभाग, संस्थेच्या संचालिका सौ.आंचल घोरपडे, विश्वस्त उषा शानभाग, मुख्याध्यापिका सौ.रेखा गायकवाड. प्राथमिक विभागाचे मुख्याध्यापक भाग्येश कुलकर्णी, क्रीडा विभाग प्रमुख अभिजीत मगर, पालक संघाचे प्रतिनिधी शिक्षक, शिक्षिका सह कार्यालयीन कर्मचाऱ्यांनी अभिनंदन करून शुभेच्छा दिल्या.