विवाहितेचा जाचहाट केल्याप्रकरणी शाहूपुरी पोलीस ठाण्यात तीन जणांविरोधात गुन्हा

by Team Satara Today | published on : 23 September 2026


सातारा : विवाहितेचा जाचहाट केल्याप्रकरणी तीन जणांविरोधात शाहूपुरी पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, सन 20 नोव्हेंबर 2020 ते 21 जून 2026 दरम्यान सातारा शहरात राहणाऱ्या एका 33 वर्षीय विवाहितेचा जाचहाट केल्याप्रकरणी पती नसरुद्दीन इमाम ताशीलदार, सासू आणि दीर अझरुद्दीन इमाम ताशीलदार (सर्व रा. मुगळी, ता. गडहिंग्लज, जि. कोल्हापूर) यांच्या विरोधात शाहूपुरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस हवालदार इष्टे करीत आहेत.


लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
सातारा जिल्हा बँकेच्या निवडणुकीचा बिगुल अखेर वाजला; १ नोव्हेंबरला मतदान, ३ नोव्हेंबरला मतमोजणी
पुढील बातमी
मुलीचे अपहरण केल्याप्रकरणी सातारा शहर पोलीस ठाण्यात एकावर गुन्हा

संबंधित बातम्या