खंडाळा तालुक्यातील कराडवाडी येथे वीज कोसळून विवाहितेचा मृत्यू

by Team Satara Today | published on : 30 March 2026


खंडाळा  : खंडाळा तालुक्यातील कराडवाडी येथे पांदी नावाच्या शिवारात शेतात काम करताना अंगावर वीज पडून सोनाली अजित कराडे या विवाहितेचा मृत्यू झाला.

मिळालेल्या माहितीनुसार, सोनाली कराडे शेतात काम करत असताना आज सायंकाळी साडेपाच ते सहाच्या दरम्यान अचानक वातावरणात बदल होऊन विजांच्या कडकडाटासह पाऊस सुरू झाला. यादरम्यान त्यांच्या अंगावर वीज पडल्याने त्या गंभीर जखमी झाल्या. त्यांना उपचारासाठी तत्काळ हलविण्याचा प्रयत्न झाला. मात्र, डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. यामुळे कराडवाडी परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. अचानक झालेल्या या घटनेमुळे कराडे कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला असून परिसरात शोककळा पसरली आहे.



लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
साताऱ्यात बसवण्यात येणारा लोकशाहिरांचा पुतळा तयार; नगराध्यक्षांसह मातंग समाजातील नेत्यांकडून मुंबईत पाहणी

संबंधित बातम्या