सुरक्षित, स्वच्छ व सुखकर वारी हेच आमचे ध्येय; वारकर्‍यांच्या सेवेसाठी प्रशासन सज्ज - डॉ. प्रिया शिंदे; पालखी मार्ग पाहणी दौरा व आढावा बैठक

by Team Satara Today | published on : 30 June 2026


सातारा : श्री संत ज्ञानेश्‍वर महाराज पालखी सोहळा 2026 चा सातारा जिल्ह्यातील आगमन दिनांक 15 जुलै रोजी होणार असल्याच्या पार्श्‍वभूमीवर पालखी मार्ग पाहणी दौरा व आढावा बैठक आज पार पडली.

या पाहणी दौर्‍यात सातारा जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा डॉ. प्रिया शिंदे, उपाध्यक्ष राजू भोसले, फलटण विधानसभा मतदारसंघाचे आमदार सचिन पाटील, महिला व बालकल्याण सभापती सौ. ऋतुजा शिंदे, शिक्षण व अर्थ समिती सभापती सौ.तेजस्विनी कदम, कृषी व पशुसंवर्धन समिती सभापती सौ. लता कर्णे, समाज कल्याण समिती सभापती ऋषिकेश धायगुडे- पाटील सातारा जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी याशनी नागराजन, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल गावडे, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेचे प्रकल्प संचालक विश्‍वास सिद, सातारा जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष व विद्यमान जिल्हा परिषद सदस्य उदय कबुले, जिल्हा परिषद सदस्य संतोष साळुंखे, वैशाली कांबळे, किरण नलावडे, ऋतुजा जगताप, विष्णू लोखंडे, खंडाळा पंचायत समितीच्या सभापती सौ.छाया जाधव, खंडाळा पंचायत समितीचे उपसभापती संतोष वीर, खंडाळा पंचायत समितीचे सदस्य यशवंत खुंटे, अतुलबाबा पवार, श्रीमती वंदना धायगुडे, अर्चना यादव, फलटण पंचायत समितीच्या सभापती शिवांजली भोसले, उपसभापती अमोल सस्ते, फलटण पंचायत समितीचे सदस्य विकास नाळे, सचिन अभंग, संजय पवार, सौ. वनिता आढाव, शुभांगी शिंदे, सौ. सीमा भोईटे व इतर मान्यवर यांची उपस्थिती होती.

यासोबतच सामान्य प्रशासन विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी निलेश घुले, ग्रामपंचायत विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी राहुल देसाई, बांधकाम उत्तर विभागाचे कार्यकारी अभियंता मोहसीन मोदी व बांधकाम दक्षिण विभागाचे कार्यकारी अभियंता विद्याधर शिंदे, ग्रामीण पाणीपुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता गौरव चक्के, शिक्षणाधिकारी (योजना) श्रीमती शबनम मुजावर, पाणी व स्वच्छता विभागाच्या उपमुख्य कार्यकारी अधिकारी श्रीमती प्रज्ञा माने, जिल्हा कार्यक्रम अधिकारी (महिला व बालविकास विभाग) नागेश ठोंबरे, प्राथमिक शिक्षण विभागाचे शिक्षणाधिकारी अनिस नायकवडी, जिल्हा आरोग्य अधिकारी महेश खलिपे, पशुसंवर्धन उपायुक्त दिनकर बोर्डे, पशूसंवर्धन अधिकारी विनोद पवार,खंडाळा पंचायत समितीचे गटविकास अधिकारी अनिल वाघमारे, जावली पंचायत समितीचे गटविकास अधिकारी डॉ. निलेश पाटील, फलटण पंचायत समितीचे गटविकास अधिकारी अक्षय घावटे व सर्व संबंधित यंत्रणांचे अधिकारी उपस्थित होते.

पाहणी दौर्‍याची सुरुवात खंडाळा तालुक्यातील पालखी सोहळ्याच्या अनुषंगाने सर्व यंत्रणाच्या अधिकारी व कर्मचारी यांची आढावा बैठकीने करण्यात आली. त्यानंतर लोणंद येथील पालखी तळ, नीरा नदीच्या पादुका स्नान ठिकाण, तरडगाव पालखी तळ तसेच वारकर्‍यांच्या निवासासाठी उभारण्यात येणार्‍या जर्मन हँगर व इतर निवासाच्या ठिकाणांची सविस्तर पाहणी करण्यात आली.

यानंतर फलटण पंचायत समिती येथे पालखी मुक्कामाच्या व दिंडी कालावधीत करावयाच्या सोयी सुविधा व उपाययोजनांच्या अनुषंगाने आढावा बैठक घेण्यात आली. यामध्ये बरड, तरडगाव व फलटण पालखी मुक्कामाचे ठिकाण फलटण विमानतळाची पाहणी करुन तेथील सोयीसुविधांचा आढावा घेण्यात आला. 

या पालखी मार्गाचे पाहणीदरम्यान रस्ते, पाणीपुरवठा, आरोग्य, स्वच्छता, निवास व्यवस्था, वाहतूक व्यवस्था तसेच वारकर्‍यांच्या सुरक्षिततेसाठी आवश्यक सर्व सुविधा यांचा सविस्तर आढावा घेण्यात आला. संबंधित सर्व यंत्रणांना वेळेत तयारी पूर्ण करण्याच्या तसेच पालखी मार्गावर चोख व शिस्तबद्ध व्यवस्था राखण्याच्या स्पष्ट सूचना देण्यात आल्या.

जिल्हा परिषद अध्यक्षा डॉ. प्रिया शिंदे म्हणाल्या, पालखी सोहळा हा महाराष्ट्राच्या सांस्कृतिक परंपरेचा आत्मा आहे. वारकर्‍यांना सुरक्षित, स्वच्छ आणि सर्व सुविधायुक्त वातावरण मिळावे यासाठी जिल्हा परिषद पूर्णतः कटिबद्ध आहे. सर्व यंत्रणांनी समन्वयाने काम करून नियोजन वेळेत पूर्ण करावे. तसेच पालखी कालावधीमध्ये सातारा जिल्ह्यातील सर्व शाळांमध्ये ज्ञानेश्‍वरी ग्रंथातील कोणत्याही अध्यायाचे वाचन करून त्याचा मतितार्थ विद्यार्थ्यांना सांगण्यात यावा. जेणेकरून विद्यार्थ्यांमध्ये संत वाङमयाची गोडी वाढीस लागेल 

 जिल्हा परिषदेच्या वतीने सर्व यंत्रणांना समन्वयाने काम करून पालखी सोहळा पर्यावरणपूरक, आरोग्यदायी व सुव्यवस्थित पार पाडण्याबाबत निर्देश या अनुषंगाने सर्व संबंधित यंत्रणांना देण्यात आले आहेत.


लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
सातारा जिल्ह्यात पश्चिम भागात पावसाचा जोर वाढला; कोयनेत १४.२४ टीएमसी पाणीसाठा, खरीप पेरण्यांना गती
पुढील बातमी
म्हसवडमधील वडार समाजावरील कारवाई विरोधात संताप; झोपड्या हटविल्याचा आरोप; जिल्हाधिकार्‍यांकडे न्यायासाठी धाव

संबंधित बातम्या