सातारा : इमारतीवरुन पडून गंभीर जखमी झालेल्याचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्याची नोंद सातारा शहर पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, गोडोली येथे इमारतीवरुन पडून गंभीर जखमी झालेल्या विठ्ठल शिंदे (वय 47, रा. खोजेवाडी ता.सातारा) यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. ही घटना दि. 9 जून रोजी घडली आहे. सातारा शहर पोलीस ठाण्यात याबाबतची नोंद झाली असून अधिक तपास महिला पोलीस हवालदार माने करीत आहेत.