सातारा : बॉम्बे रेस्टॉरंट येथील मोकळ्या जागेत पुलाखाली झोपले असताना फिरून साडी विक्री करणाऱ्याच्या ताब्यातील ८७ हजारांच्या साड्या अज्ञाताने चोरी केल्या आहेत.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, उत्तरप्रदेश येथील साडी विक्री व्यावसायिक अली पुरगुलाल अहमद (वय ३५) हा दिवसभर साड्या विकून व्यवसाय करत असतो. दि. २४ रोजी रात्री ११ वाजता बॉम्बे रेस्टॉरंट फुलाखाली दत्त मंदिराच्या पाठीमागे उघड्यावर विक्री करणाऱ्या साड्या सोबत घेऊन झोपला असताना अज्ञात इसमाने त्याच्याकडील वेगवेगळ्या रंगाच्या ८७ हजार रुपये किमतीच्या २९ साड्या,१५ हजार रुपये किमतीचा मोबाईल असा एकूण १ लाख २ हजार रुपये किमतीचा मुद्देमाल चोरी करून पळ काढला.
याप्रकरणी सातारा शहर पोलीस ठाण्यात अज्ञाता विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास पोलीस हवालदार चांदेरे करत आहेत.