सातारा शहरात चेनस्नॅचिंगच्या घटना पुन्हा डोके वर काढू लागल्या; केसरकर पेठेत भरदिवसा चेनस्नॅचिंग

by Team Satara Today | published on : 27 July 2026


सातारा : सातारा शहरात चेनस्नॅचिंगच्या घटना पुन्हा डोके वर काढू लागल्या असून केसरकर पेठ परिसरात भरदिवसा एका ज्येष्ठ महिलेच्या गळ्यातील सुमारे 45 हजार रुपये किमतीचे सोन्याचे मिनी गंठण अज्ञात चोरट्याने हिसकावून नेल्याची घटना घडली. या प्रकारामुळे नागरिकांमध्ये असुरक्षिततेची भावना निर्माण झाली आहे.

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शकुंतला धनाजीराव शिंदे (वय 75, रा. चारभिंती रोड, केसरकर पेठ) या समर्थ मंदिराकडून घरी पायी जात होत्या. घोरपडे कार्यालयासमोरील सार्वजनिक गणेशोत्सव मंडप उभारणीच्या ठिकाणाजवळ पोहोचताच एका अज्ञात व्यक्तीने त्यांच्या गळ्यातील सुमारे 17 ग्रॅम वजनाचे सोन्याचे मिनी गंठण झडप घालून हिसकावले आणि क्षणार्धात पसार झाला. या घटनेप्रकरणी सातारा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस हवालदार भोंडवे पुढील तपास करीत आहेत.


लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
रिमझिम पावसात बेंदराचा उत्साह; जिल्ह्यात बैलांच्या मिरवणुकांनी वेधले लक्ष
पुढील बातमी
किरकोळ कारणावरून शेजार्‍यांमध्ये झालेल्या वादाला हिंसक वळण; दोन महिलांना मारहाणप्रकरणी चौघांवर गुन्हा

संबंधित बातम्या