वाठार, ता. कराड गावच्या हद्दीत महामार्ग ओलांडताना कारच्या धडकेत पादचारी ठार

by Team Satara Today | published on : 12 October 2025


सातारा  :  महामार्ग ओलांडताना दुभाजकावर उभ्या असलेल्या पादचार्‍याला कारने जोराची धडक दिली. त्यामध्ये पादचार्‍याचा मृत्यू झाला. पुणे-बंगळूरू आशियाई महामार्गावर वाठार, ता. कराड गावच्या हद्दीत गणेश पेट्रोल पंपाजवळ रविवारी दुपारी तीन वाजण्याच्या सुमारास हा अपघात झाला.

संजय पांडुरंग देसाई (वय 55, रा. वाठार) असे अपघातात ठार झालेल्याचे नाव आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, वाठार येथील संजय देसाई हे रविवारी दुपारी पुणे-बंगळूर आशियाई महामार्ग ओलांडत होते. महामार्ग ओलांडण्यासाठी ते दुभाजकावर उभे असताना कोल्हापूर बाजूकडून आलेल्या कारने त्यांना जोराची धडक दिली. त्यामध्ये त्यांच्या डोक्याला, छातीला व पायाला गंभीर दुखापत झाली. नागरिकांनी त्यांना उपचारासाठी कृष्णा रुग्णालयात दाखल केले. मात्र, उपचारापूर्वीच त्यांचा मृत्यू झाला.

याबाबत महबूब चांदसाब मुलाणी यांनी कराड ग्रामीण पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. अपघातप्रकरणी कारचालक मुकुंद मधुकर भट (रा. दत्त मंदिर रोड, वाकड, पुणे) याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.


लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
भाजप, आरएसएसकडून लाेकतंत्र संपवण्याचे काम; काँग्रेसचे राष्ट्रीय सचिव बी. एम. संदीप यांचा आरोप
पुढील बातमी
बहारदार कलाविष्काराने औंध संगीत महोत्सवाची सांगता; हजारो रसिकांची उपस्थिती; विद्वत्तापूर्ण गायकीला दाद

संबंधित बातम्या

सैदापूर, ता. कराड येथील हॉटेलला आग लागून दोन लाखांचे नुकसान कराड : कराड-विटा मार्गानजीक सैदापूर, ता. कराड येथील ओम साई कॉम्प्लेक्समधील चायनीज सेंटरला मंगळवारी (दि. 4) मध्यरात्री आग लागून, सुमारे दोन लाख रुपयांचे नुकसान झाले. याबाबत ज्ञानेश्वर शिवलिंग कुंभार यांनी कराड शहर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. सैदापूर येथील जेके पेट्रोल पंपाजवळच्या ओम साई कॉम्प्लेक्समध्ये कुंभार यांचे डीके चायनीज बिर्याणी कॉर्नर हे हॉटेल आहे. कुंभार यांनी मंगळवारी रात्री उशिरा हॉटेल बंद केले. त्यानंतर मध्यरात्री हॉटेलल