झेडपीसमोर खेडचे सरपंच यांचे ठिय्या आंदोलन

by Team Satara Today | published on : 31 August 2024


सातारा : सातारा शहरानजिकच्या खेड ग्रामपंचायतीमध्ये विकासकामे मंजूर असूनही कामे पूर्ण करण्यासाठी साहिल अकबर शेख हा युवक अडथळा निर्माण करत आहे. यामुळे खेडचे सरपंच लता फरांदे, उपसरपंच, सदस्य यांनी झेडपी कार्यालयासमोर शुक्रवारी ठिय्या आंदोलन सुरु केले आहे. दरम्यान, झेडपीच्या प्रशासनाला निवेदन देण्यात आले आहे. 

दिलेल्या निवेदनात म्हटले आहे, खेड ग्रामपंचायतीच्या हद्दीत गेल्या वीस वर्षापासून उघड्यावर असलेले गटर बंदिरस्त करण्यासाठी येथील एक युवक अडथळा निर्माण करत आहे. त्याचबरोबर सरपंच, उपसरपंच, सदस्य  यांच्यावर खोटे गुन्हे दाखल करत आहे, असा आरोप येथील सदस्यांनी केला आहे. दरम्यान, या ठिकाणी विकासकामे होत नसल्यामुळेच खेडचे सरपंच लता फरांदे, उपसरपंच, सदस्य यांनी आंदोलन सुरु केले आहे. 

उपसरपंच म्हणाले, येथील रस्ता नोंद असून त्या शेजारील गटर ओपन असल्यामुळे नागरिकांना साथीच्या आजारांचा सामना करावा लागत आहे. त्यामुळे येथे बंदीस्त गटर करण्याचा नागरी सुविधेखाली निर्णय घेतला. पण साहिल अकबर शेख हा युवक सातत्याने माहितीच्या अधिकारात ग्रामपंचायतीच्या विकासकामांच्या नावाखाली खो घालत आहे. त्यामुळे प्रशासनाने याबाबीची गांभीर्याने दखल घेवून नागरिकांना दिलासा द्यावा.


लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
युवकाला लाकडी दांडक्याने मारहाण
पुढील बातमी
बिलाच्या थकबाकीमुळे कनेक्शन तोडलेल्या ३८ लाख ग्राहकांसाठी महावितरण अभय योजना २०२४

संबंधित बातम्या