बागेश्वर धामकडे जाणाऱ्या ऑटोला ट्रकची धडक

७ जणांचा मृत्यू, अनेक जखमी

by Team Satara Today | published on : 20 August 2024


छतरपूर : मध्य प्रदेशातील छतरपूरमध्ये भीषण अपघात झाला आहे. छतरपूरमध्ये भरधाव वेगात आणि बेदरकारपणे येणाऱ्या ट्रकने ऑटोला जोरदार धडक दिली. या दुर्घटनेत सात जणांचा मृत्यू झाला आहे तर सहा जण गंभीर जखमी आहेत. पोलिसांनी ट्रकचालकाविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

पोलीस अधिकाऱ्यांकडून मिळालेल्या माहितीनुसार, ऑटो छतरपूर रेल्वे स्थानकातून बागेश्वर धामच्या दिशेने जात होती. या वेळी राष्ट्रीय महामार्ग ३९ वर ट्रकने ऑटोला जोरदार धडक दिली. या अपघातात ऑटोमधून प्रवास करणाऱ्या सात जणांचा मृत्यू झाला, तर सहा जण गंभीर जखमी झाले असून, त्यांना शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, छतरपूर रेल्वे स्थानकावरून हे भाविक बागेश्वर धामला जात होते. याच दरम्यान वाटेत अपघात झाला. मृतांमध्ये लहान मुलं आणि वृद्धांचा समावेश आहे. अपघातात ऑटोचं पूर्णपणे नुकसान झालं आहे. मृत्यू झालेल्या सात जणांच्या कुटुंबीयांना मुख्यमंत्री आर्थिक निधीतून तातडीची मदत दिली जाणार आहे. 

पहाटे साडेपाचच्या सुमारास हा अपघात झाला. त्यावेळी ऑटोमध्ये ११-१२ जण बसले होते. रेल्वे स्थानकावरून बागेश्वर धामकडे जात होते. त्यात क्षमतेपेक्षा तिप्पट प्रवासी होते. तर दुसरीकडे ट्रक चालकही अतिशय वेगात आणि बेदरकारपणे गाडी चालवत होता. याच दरम्यान अपघात झाला. 

 


लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
अभिनेत्री काजोलच्या पोस्टने वेधलं नेटकऱ्यांचं लक्ष
पुढील बातमी
सुनीता विल्यम्स आणि बुश विल्मोर यांना कॅन्सर हा गंभीर आजार होण्याची शक्यता

संबंधित बातम्या