सातारा : ब्राह्मण महासंघाच्या वतीने रविवार दि. 19 रोजी सायंकाळी चार ते सात शाहू कलामंदिर येथे परशुराम जन्मोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे.
यावेळी जगद्गुरु श्री श्री श्री विद्या नरसिंह भारती शंकराचार्य करवीर पीठ कोल्हापूर यांच्या मार्गदर्शनांतर्गत 'सारेगामापा सुर नवा ध्यास नवा' फेम सुप्रसिद्ध गायक प्रशांत काळुंदरेकर यांचे भक्ती गीत गायन 'सखा पांडुरंग' कार्यक्रमाने होणार आहे ब्राह्मण महासंघ हा नोंदणीकृत संस्था असून दरवर्षी या महोत्सवाचे आयोजन करण्यात येते.
महासंघाच्या वतीने दरवर्षी सामूहिक गुरुचरित्र पारायण वधु-वर सुचक मिळावे सामूहिक मौजी बंधन कार्यक्रम परशुराम जन्मोत्सव कार्यक्रम असे कार्यक्रम घेतले जातात परशुराम जन्म महोत्सव दरवर्षी भव्य दिव्य स्वरूपात साजरा केला जातो.
या महोत्सवाचे उद्घाटन ना. शिवेंद्रसिंहराजे भोसले (कॅबिनेट मंत्रीसार्वजनिक बांधकाम विभाग ) यांच्या हस्ते होणार आहे. साताऱ्याची नगराध्यक्ष अमोल मोहिते यांची या कार्यक्रमाला उपस्थिती आहे. या कार्यक्रमाला सातारकरांनी बहुसंख्येने उपस्थित रहावे, असे आवाहन ब्राह्मण महासंघातर्फे करण्यात आले आहे.