मुंबई शहर व उपनगरात पावसाचा जोर कायम ; २४ तासात ११० ते १२६ मिमी पाऊस

by Team Satara Today | published on : 03 July 2026


मुंबई : शहर व उपनगरात पावसाचा जोर कायम असून शुक्रवारी ही पावसाचा जोर कायम आहे. गेल्या २४ तासात सकाळी ८ वाजेपर्यंत शहर विभागात १२६ मिमी, पूर्व उपनगरात ११० मिमी आणि पश्चिम उपनगरात ११४ मिमी पावसाची नोंद झाली.

मुंबईत उशिरा पाऊस दाखल झाला असला तरी गेल्या तीन-चार दिवसांपासून पावसाचा जोर कायम आहे. त्यामुळे ठिकठिकाणी पाणी तुंबत असून जनजीवन विस्कळीत झाले आहे. शुक्रवारी मध्यरात्रीपासून पावसाने जोर धरला होता. सकाळी थोडा जोर कमी झाला मात्र अवघ्या तीन-चार तासांमध्ये ६० ते ६५ मिमी पावसाची नोंद झाली.

पश्चिम द्रुतगती महामार्गासह उपनगर व शहरातील प्रमुख रस्त्यांवर सकाळी वाहतूक कोंडी होती. मध्य व पश्चिम रेल्वेच्या लोकल ही पाच ते दहा मिनिट विलंबाने धावत होत्या. दरम्यान दुपारी अरबी समुद्राला मोठी भरती असल्यामुळे महापालिकेने सतर्क राहण्याच्या सूचना जीव रक्षकांचा अग्निशमन दल व पालिकेच्या आपत्कालीन विभागाला दिल्या आहेत.


लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
राज्यातील शाळांच्या ५०० मीटर परिसरात स्टिंग एनर्जी ड्रिंक विक्री करण्यास बंदी घालण्याचा निर्णय - मंत्री नरहरी झिरवाळ यांची विधानसभेत माहिती
पुढील बातमी
सातारा-नित्रळ मार्गावर काळेश्वरी घाटात जखमी बिबट्याला वनविभागाने केले सुरक्षित रेस्क्यू

संबंधित बातम्या