सातारा : सरकारी कामात अडथळा आणल्याप्रकरणी रिक्षा चालकाविरोधात सातारा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, मनाली कॉर्नर ते भोसले चौक रस्त्यावर महिला पोलिसाला फरफटत नेल्याप्रकरणी रिक्षा चालक देवराज काळे (रा.मोळाचा ओढा, सातारा) याच्यावर शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. याप्रकरणी वाहतुक महिला पोलिस भाग्यश्री नामदेव जाधव यांनी तक्रार दिली आहे. दि. 18 ऑगस्ट रोजी त्या जखमी झाल्या होत्या. अधिक तपास पोलीस हवालदार देशमुख करीत आहेत.