सातारा : अल्पवयीन मुलीचे लैंगिक शोषण केल्याप्रकरणी शाहूपुरी पोलीस ठाण्यात एका संशयिताविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या प्रकरणात मिनाज वसीम बागवान (रा. सोमवार पेठ, सातारा) याच्याविरुद्ध पीडित मुलीच्या कुटुंबीयांनी दिलेल्या फिर्यादीवरून पोक्सो कायद्यानुसार गुन्हा नोंदविण्यात आला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस निरीक्षक संग्राम शेवाळे करीत आहेत.