खंडाळा : खरीप हंगाम २०२६ मध्ये Trigger-1 (प्रथम कळ) लागू झालेल्या राज्यातील २६५ तालुक्यांमध्ये पिकांच्या नुकसानीचे पंचनामे तातडीने सुरू करण्याचे निर्देश शासनाने दिले आहेत. यामध्ये सातारा जिल्ह्यातील खंडाळा तालुक्याचा समावेश आहे. त्यानुसार तालुक्यात पंचनाम्यांना सुरुवात झाली असून, तहसीलदार रविराज जाधव यांनी ग्राम महसूल अधिकारी, कृषी सहाय्यक आणि संबंधित शेतकऱ्यांच्या उपस्थितीत प्रत्यक्ष शेतावर जाऊन नुकसानीची पाहणी केली.
शासन निर्णयानुसार सर्वेक्षण केलेल्या क्षेत्रातील पिकांची सद्यस्थिती दर्शविणारी छायाचित्रे आणि GPS Coordinates संकलित करून अहवाल सादर केला जाणार आहे.
अनुदानासाठी ई-पिक पाहणी आवश्यक आहे. त्यामुळे खंडाळा तालुक्यातील शेतकऱ्यांनी आपल्या शेतातील पिकांची ई-पिक पाहणी शेतकरी लॉगिनद्वारे किंवा गावातील पाहणी सहाय्यकाच्या माध्यमातून करून घ्यावी, असे आवाहन तहसीलदार रविराज जाधव यांनी केले आहे.
पंचनामा प्रक्रियेसाठी शेतकऱ्यांनी बँक खाते क्रमांक, IFSC कोड, Farmer ID आणि आवश्यक कागदपत्रे तयार ठेवावीत, जेणेकरून पुढील कार्यवाही सुलभ होईल. शेतकऱ्यांनी पंचनामा पथकांना सहकार्य करून ई-पिक पाहणी वेळेत पूर्ण करून घ्यावी, असे आवाहन तहसीलदार रविराज जाधव यांनी केले आहे.
खंडाळा तालुक्यात पिकांच्या नुकसानीचे पंचनामे सुरू; शेतकऱ्यांनी ई-पिक पाहणी करून घेण्याचे तहसीलदार रविराज जाधव यांचे आवाहन
by Team Satara Today | published on : 28 September 2026
लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा