मेंढ्या मागे-पुढे जाण्याच्या कारणातून दोन गटात वाद; परस्‍पर विरोधी तक्रारी दाखल

by Team Satara Today | published on : 29 March 2026


सातारा : देवाला प्रदक्षिणा घालत असताना मेंढ्या मागे-पुढे जाण्याच्या कारणातून दोन गटात वाद होवून मारहाण झाली. याप्रकरणी परस्‍पर विरोधी तक्रार दाखल झाल्‍या आहेत.

बळीराम वाघमोडे, रामदास वाघमोडे, आप्‍पा वाघमोडे, धनाजी वाघमोडे, विठ्ठल वाघमोडे, विजय वाघमोडे, धुळदेव वाघमोडे यांच्या विरुध्द शंकर नारायण कोरे (वय ४२, सर्व रा. धनगरवाडी पो. निगडी तर्फ सातारा) यांनी तक्रार दिली आहे. दुसरी तक्रार विजय तुळशीराम वाघमोडे (वय ४०) यांनी शंकर कोरे, महादेव कोरे, हणमंत काेरे, भास्‍कर कोरे, दिनकर कोरे, सागर कोरे, अक्षय काेरे, रोशन कोरे, शुभम काेरे, ओंकार कोरे यांच्या विरुध्द तक्रार दिली आहे. ही घटना दि. २८ मार्च रोजी घडली आहे.


लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
कराड तालुक्यातील शहापुरात बिबट्याचा हल्ला ; दोन दिवसांत तीन युवक जखमी
पुढील बातमी
सातारा शहर पोलिस ठाण्यासमोर भांडणे करुन सार्वजनिक शांततेचा भंग केल्‍याप्रकरणी दोघांवर गुन्हा

संबंधित बातम्या