09:50pm | Dec 26, 2024 |
सातारा : चार भिंती परिसरात युवकाला लाकडी दांडक्याने मारहाण करून त्याच्याकडून एक लाख दहा हजाराचा मुद्देमाल पळवणार्या दोन सराईत गुन्हेगारांना सातारा शहर पोलीस ठाण्याच्या गुन्हे प्रकटीकरण शाखेने अटक केली आहे.
यश सुरेश शिंदे वय 22 रा. खंडोबाचा माळ, पंताचा गोट, रविवार पेठ, सातारा आणि अहमद खान वय 21, रा. शाहूनगर, जगतापवाडी, सातारा अशी आरोपींची नावे असून त्यांच्याकडून मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. न्यायालयाने या दोघांना दोन दिवसाची पोलीस कोठडी दिली आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, दि. 23 डिसेंबर रोजी फिर्यादी युवक एसटी स्टँड ते पोवई नाका येथे जात असताना संबंधित दोघांनी त्याला दारू पिण्यासाठी पैसे मागितले. मात्र युवकाने नकार दिल्याने त्याला जबरदस्तीने दुचाकी गाडीवर बसवून त्याच्या पैशाने आरोपींनी दारू खरेदी केली व चार भिंती परिसरामध्ये नेऊन त्याला लाकडी दांडक्याने मारहाण केली. तसेच संबंधितांनी त्याच्याकडील मोबाईल व दुचाकी असा एक लाख दहा हजार किमतीचा मुद्देमाल लांबवला.
या गुन्ह्यासंदर्भात सातारा शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक राजेंद्र मस्के यांनी गुन्हे प्रकटीकरण शाखेचे पोलीस निरीक्षक सचिन म्हेत्रे यांना तपासाच्या सूचना दिल्या. तक्रारदाराने दिलेल्या माहितीनुसार डीबी पथकाने रेकॉर्डवरील एका गुन्हेगाराला पहिल्यांदा ताब्यात घेतले. त्याच्याकडे कसून चौकशी केली असता त्याने अन्य एका साथीदाराच्या मदतीने हा गुन्हा केल्याचे कबूल केले. यानंतर दुसर्या संशयितालाही पकडण्यात आले. या दोघांनाही न्यायालयासमोर हजर केले असता त्यांना दोन दिवसाची पोलीस कोठडी देण्यात आली आहे. तसेच मोबाईल व मोटरसायकल त्यांच्याकडून हस्तगत करण्यात आली आहे.
या कारवाईमध्ये सातारा शहर पोलीस ठाण्याच्या गुन्हे प्रकटीकरण शाखेचे सहायक पोलीस निरीक्षक शाम काळे, पोलीस उपनिरीक्षक सुधीर मोरे, निलेश यादव, सुजित भोसले, सुनील मोहिते, निलेश जाधव, विक्रम माने, पंकज मोहिते, सचिन शिंदे, इरफान मुलाणी, संतोष घाडगे, सागर गायकवाड, विशाल धुमाळ, मच्छिंद्रनाथ माने, सुशांत कदम यांनी सहभाग घेतला.
उत्तेकर नगर मध्ये 55 हजारांची घरफोडी |
शासकीय कामात अडथळा आणल्या प्रकरणी एकावर गुन्हा |
विलासपूर येथे सुमारे पावणे दोन लाखांची घरफोडी |
खुनाचा प्रयत्न केल्याप्रकरणी पाच जणांवर गुन्हा |
लग्नाच्या आमिषाने युवतीवर अत्याचार |
रहदारीस अडथळा आणल्या प्रकरणी एकावर गुन्हा |
आयेशा ताहेर मणेर हिचे सीए परीक्षेत यश |
सरपंच परिषदेचे रास्ता रोको नंतर धरणे आंदोलन |
डॉ. मनमोहन सिंह यांच्या निधनाची बातमी अत्यंत वेदनादायी |
डॉ. बाबासाहेब आंबेडकरवादी संघटनांचा सातारा शहरात मोर्चा |
बांधकाम विभागाने कामाच्या दर्जाबाबत तडजोड करू नये |
संगममाहुली येथील राजघाटाचे पुर्ननिर्माण करणार : मंत्री शिवेंद्रसिंहराजे |
तोतया ‘आयपीएस’चा आणखी सोळा जणांना गंडा |
महाबळेश्वरसह जिल्ह्यातील मधपाळ संकटात |
देशातील ग्रामीण भागात नवीन बहुउददेशीय सहकारी संस्था उघडण्याचा निर्णय कौतुकास्पद |
रहदारीस अडथळा आणल्या प्रकरणी एकावर गुन्हा |
आयेशा ताहेर मणेर हिचे सीए परीक्षेत यश |
सरपंच परिषदेचे रास्ता रोको नंतर धरणे आंदोलन |
डॉ. मनमोहन सिंह यांच्या निधनाची बातमी अत्यंत वेदनादायी |
डॉ. बाबासाहेब आंबेडकरवादी संघटनांचा सातारा शहरात मोर्चा |
बांधकाम विभागाने कामाच्या दर्जाबाबत तडजोड करू नये |
संगममाहुली येथील राजघाटाचे पुर्ननिर्माण करणार : मंत्री शिवेंद्रसिंहराजे |
तोतया ‘आयपीएस’चा आणखी सोळा जणांना गंडा |
महाबळेश्वरसह जिल्ह्यातील मधपाळ संकटात |
देशातील ग्रामीण भागात नवीन बहुउददेशीय सहकारी संस्था उघडण्याचा निर्णय कौतुकास्पद |
रोटरी क्लबतर्फे ’राष्ट्र निर्माता’ पुरस्काराने शिक्षकांच्या गौरव |
शहीद जवान शुभम घाडगे यांच्या पार्थिवावर कामेरी येथे शासकीय इतमामात अंत्यसंस्कार |
कोयना हेळवाक वनपरिक्षेत्रातील सर्व पर्यटनस्थळे 5 दिवस बंद |
मंत्री भरत गोगावले यांचा गड, किल्ला स्वच्छता मोहिमेस पाठिंबा |
युवती बेपत्ता |