सातारा : नृत्य कलेबरोबरच सामाजिक भान जपणाऱ्या आणि विशेष म्हणजे गृहिणींच्या कलेला वाव देण्यासाठी सुरू करण्यात आलेल्या साताऱ्यातील विश्वरूपिणी ग्रुपच्या सदस्यांनी सातारा तालुक्यातील महागाव येथे मातोश्री वृद्धाश्रमाला भेट दिली. तेथील वृद्ध महिलांसाठी साड्या, कपडे, जीवनावश्यक वस्तू आणि धान्य स्वरूपात मदत देखील केली.
विश्वरूपिणी ग्रुपच्या वतीने वर्षातून दोन वेळा याप्रकारे विविध संस्थांमध्ये उपक्रम राबवून, तेथे नृत्य कलेने मोफत मनोरंजन तर करण्यात येतेच, शिवाय शक्य तेवढी मदत सुद्धा करण्यात येते. आजचा उपक्रम अशाच उपक्रमांचा भाग होता.
या कार्यक्रमावेळी विश्वरूपीनी ग्रुपच्या संस्थापिका अनघा परांजपे, अनिता द्रविड , वैशाली पाचवडकर, तृप्ती देशमुख, अर्पिता नाडगवडा, शिल्पा जंगम, सुवर्णा जंगम, निवेदिता मुळे या सर्व ग्रुपमधील महिला उपस्थित होत्या. या सर्वांनी मिळून हा उपक्रम राबवला.