आदित्य, अमित ठाकरेंच्या अडचणीत वाढ; शिवाजी पार्क पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल, ३०० आंदोलकांवर देखील गुन्हा

by Team Satara Today | published on : 12 October 2026


मुंबई :  आदित्य आणि अमित ठाकरे यांच्यावर शिवाजी पार्क पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. त्यांच्यावर बेकायदेशीररित्या जमाव जमवण्याचा आणि सरकारी कामात अडथळा आणल्याचा आरोप ठेवण्यात आला आहे.
आदित्य आणि अमित ठाकरे यांच्यावर बेकायदेशीर जमाव जमवणे आणि सरकारी कामात अडथळा आणणे, परवानगी नसताना आंदोलन करणे, या कलमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांकडून ठाकरे बंधूंसोबत असलेल्या सर्व नेते आणि पदाधिकाऱ्यांवर देखील गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
गुन्हा नोंद झालेल्या नेत्यांमध्ये आदित्य ठाकरे, अमित ठाकरे, अनिल परब, महेश सावंत, वरुण सरदेसाई, नितीन सरदेसाई, संदीप देशपांडे, यशवंत किल्लेदार , सुनील प्रभू यांसह ठाकरेंचे काही पदाधिकारी आणि मनसेच्या पदाधिकाऱ्यांचा समावेश आहे.
राजकीय नेत्यांसह 300 हून अधिक आंदोलकांवर देखील मुंबई पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. अमित ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांनी आंदोलकांनी भरलेली पोलिस व्हॅन अडवून सरकारी कामात अडथळा निर्माण केला असा ठपका त्यांच्यावर ठेवण्यात आला आहे.


लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
कॉकरोच जनता पार्टीने विरोधकांच्या सुप्रीम मार्चला दिला पाठिंबा; इंडिया गेटपासून करणार कूच
पुढील बातमी
दुष्काळग्रस्तांसाठी पुढील ६ ते ८ महिने विशेष नियोजन; मुख्यमंत्री फडणवीसांची माहिती, दुष्काळी भागातील परिस्थितीबाबतचा अहवाल केंद्र शासनाला सादर होईल

संबंधित बातम्या