सातारा : बाप-लेकाला मारहाण केल्याप्रकरणी दोन जणांविरोधात शाहूपुरी पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, दि. २४ रोजी रात्री साडेदहा वाजण्याच्या सुमारास दारू पिण्यास पैसे दिले नाहीत म्हणून रोहित संजय बंडगर याला मारहाण करून नंतर मारहाणीचा जाब विचारायला आलेल्या रोहितचे वडील संजय रामचंद्र बंडगर (रा. आकाशवाणी झोपडपट्टी सातारा० यांना दगडाने मारहाण केल्याप्रकरणी तेथीलच रोहन घाडगे आणि करण घाडगे यांच्या विरोधात शाहूपुरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास पोलीस हवालदार गायकवाड करीत आहेत.