महिला वकिलाला मारहाण करत विनयभंग; सातारा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

by Team Satara Today | published on : 05 March 2026


सातारा : शहर परिसरात राहणाऱ्या महिला वकिलाला मारहाण करत तिचा विनयभंग केल्याची घटना दि. ४ रोजी दुपारी अडीच वाजण्याच्या सुमारास घडली आहे. याप्रकरणी तुषार ज्ञानेश्वर तरडे (रा. बामनोली तर्फ कुडाळ,ता. जावली) याच्या विरोधात सातारा शहर पोलीस ठाण्यात विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

पोलिसांनी दिलेली माहिती अशी, फिर्यादी २५ वर्षीय महिला वकील यांच्यासमवेत त्यांची बहिणी राहत आहे. बहिणीचे पती तुषार तरडे हे तिला परत घरी घेऊन जाण्यासाठी आले असताना तिने जाण्यास नकार दिला यावरून त्यांनी बहिणीला मारहाण केली त्यांचे भांडण सोडवण्याचा प्रयत्न करत असताना महिला वकील यांनी मध्यस्थी केली. यावेळी तरडे यांनी फिर्यादी वकील महिलेला घराबाहेर ओढून बेदम मारहाण केली व धक्काबुक्की करून मनासं लज्जा उत्पन्न होईल असे विधान केले. यावरून फिर्यादी महिला वकिलाने सातारा शहर पोलीस ठाण्यात विनयभंगाचा गुन्हा दाखल केला आहे. अधिक तपास पोलीस हवालदार सूर्यवंशी करत आहेत.


लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
साताऱ्यातील सोनाराची जावलीच्या दोघांनी केली ५९ लाखांची फसवणूक; सातारा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल
पुढील बातमी
सातारा शहराच्या विकास आराखड्यामध्ये गंभीर त्रुटी; नगरसेविका मुक्ता लेवे यांचे नगरपालिकेला पत्र :आरक्षणे लोकसंख्येच्या व्यस्त प्रमाणात

संबंधित बातम्या