के.एस.डी शानभाग विद्यालयाचे शालेय तालुकास्तरीय योगासन स्पर्धेमध्ये यश

by Team Satara Today | published on : 23 August 2024


सातारा :  येथील श्यामसुंदरी चॅरिटेबल अँड रिलीजियस सोसायटीचे के. एस. डी शानभाग विद्यालय आणि कला,वाणिज्य व विज्ञान शाखेच्या महाविद्यालयाच्या विद्यार्थिनींनी  14 व 19 वर्ष  मुलींचा गटामध्ये जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय सातारा द्वारे आयोजित तालुकास्तरीय योगासन स्पर्धेमध्ये यश संपादन केले.

कु. रिया सागर कापसे या 7 वी ब मधील विद्यार्थिनीने उत्कृष्ट कामगिरी करीत 14 वर्षे मुलींच्या वयोगटामध्ये रिदमिक योगा प्रकारात प्रथम क्रमांक प्राप्त केला, व पारंपारिक योग प्रकारात पाचवा क्रमांक मिळविला. तसेच, कु. सुभाषी जगदीश शिंदे या 10 वी ब मधील विद्यार्थिनीने 19 वर्ष मुलींचा वयोगतमध्ये पारंपारिक योगा व रिदामिक प्रकारामध्ये प्रथम क्रमांक नोंदविला आणि उत्कृष्ठ कामगिरी केली. या दोन्ही विद्यार्थिनीचे जिल्हास्तरीय योगासन स्पर्धेसाठी निवड झाली आहे. या विद्यार्थिनींना सौ. सुवर्णा वाघमारे यांचे मार्गदर्शन मिळाले व सौ.विमल ढेरे यांचे सहकार्य लाभले.

या यशाबद्दल महाविद्यालयाचे संस्थापक व ज्येष्ठ क्रीडा मार्गदर्शक रमेश शानभाग संस्थेच्या संचालिका सौ.आँचल घोरपडे, विश्वस्त सौ.उषा शानभाग, विद्यालयाच्या मुख्याध्यापिका सौ.रेखा गायकवाड, प्राथमिक विभागाचे मुख्याध्यापक भाग्येश कुलकर्णी, क्रीडा विभागप्रमुख अभिजीत मगर, पालक संघाचे प्रतिनिधी आणि शिक्षक शिक्षकांसह, कार्यालयीन कर्मचाऱ्यांनी अभिनंदन करून पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.


लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
महाविकास आघाडीने उद्या महाराष्ट्र बंद पुकारला
पुढील बातमी
पंतप्रधान नरेंद्र मोदींना खरंच नोबेल शांतता पुरस्कार मिळणार?

संबंधित बातम्या