पदवीधर व शिक्षक मतदार संघाच्या प्रारुप व अंतिम मतदार याद्या तयार करण्यास मुदतवाढ

by Team Satara Today | published on : 16 November 2025


पुणे : पदवीधर व शिक्षक मतदार संघासाठी १ नोव्हेंबर २०२५ या अर्हता दिनांकावर आधारित  नव्याने मतदार याद्या तयार करण्याचा (De-Novo) कार्यक्रम सुरू असून प्रारुप मतदार याद्या प्रसिद्ध करण्यास भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार ३ डिसेंबर व अंतिम मतदार याद्या तयार करण्यास १२ जानेवारी २०२६ पर्यंत मुदतवाढ देण्यात आली असल्याची माहिती विभागीय आयुक्त तथा पुणे विभाग पदवीधर व शिक्षक मतदार संघाचे मतदान अधिकारी डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार यांनी दिली आहे.

सुधारित कार्यक्रमानुसार हस्तलिखिते तयार करणे व प्रारुप मतदार याद्यांची छपाई- शुक्रवार २८ नोव्हेंबर, प्रारुप मतदार याद्यांची प्रसिद्धी- बुधवार ३ डिसेंबर, दावे व हरकती स्वीकारण्याचा कालावधी- ३ ते १८ डिसेंबर, दावे व हरकती निकाली काढणे, पुरवणी यादी तयार करणे व छपाई करणे- सोमवार ५ जानेवारी २०२६ व मतदार यादीची अंतिम प्रसिद्धी- सोमवार १२ जानेवारी २०२६ रोजी करण्यात येईल.


लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
विवाहितेस जाचहाटप्रकरणी पती विरोधात गुन्हा
पुढील बातमी
‘स्वदेशी’ राज्यस्तरीय साहित्य संमेलनाचे दि. 30 नोव्हेंबर रोजी आसू येथे आयोजन

संबंधित बातम्या