04:20pm | Nov 13, 2024 |
नवी दिल्ली : संरक्षण संशोधन आणि विकास संघटनाने (DRDO) 1000 किमी रेंज असलेल्या लॉंग अटॅक क्रूझ मिसाईल LRLACM ची प्रथम यशस्वी चाचणी केली. ही चाचणी ओडिशाच्या असलेल्या चांदीपूर येथील इंटिंग्रेटेड टेस्ट रेंडवर मोबाइल आर्टिक्युलेटेड लॉन्चरच्या मदतीने करण्यात आली. हे मिसाईल नवी सुधारित वैशिष्ट्यांसह निःर्भय LRLACM चे एक नवीन प्रकार आहे, असे अधिकाऱ्यांनी सांगितले.
मिशनची उद्दिष्टे पूर्ण
मिळालेल्या माहितीनुसार, या चाचणीदरम्यान मिसाईलचे सर्व पार्ट्स अपेक्षेप्रमाणे कार्यरत राहिले. यामुळे प्राथमिक मिशन उद्दिष्टे पूर्ण झाली. मिसाईलचे कामगिरी रडार, इलेक्ट्रो ऑप्टिकल ट्रॅकिंग सिस्टम आणि टेलिमेट्रीसारख्या अनेक रेंज सेन्सर्सच्या मदतीने निरीक्षण करण्यात आले. ही इंडिग्रेटेड टेस्ट रेंडच्या विविध ठिकाणी तैनात करण्यात आली होती. यामुळे उड्डाण मार्गाचा संपूर्ण कव्हरेज मिळू शकले.
याबाबत एक निवेदन जाहीर करण्यात आले आहे. DRDO ने त्यांच्या निवेदनात म्हटले आहे की, “मिसाईलने विविध वेपॉइंट्समार्गे नेव्हिगेशन केले आणि विविध उंची आणि वेगावर उड्डाण करत असताना विविध प्रकारच्या हालचालींचे प्रदर्शन केले. मिसाईलमध्ये सुधारित एव्हिऑनिक्स आणि सॉफ्टवेअर समाविष्ट करण्यात आले आहे. यामुळे क्षेपणास्त्राची अधिक चांगली आणि विश्वासहार्य कामगिरी सुनिश्चित होते.”
या संघटनांनीही दिले योगदान
तसेच, हे मिसाईल एरोनॉटिकल डेव्हलपमेंट एस्टॅब्लिशमेंट, बेंगळुरू यांनी विकसित केले आहे. त्याचबरोबर DRDO च्या अन्य प्रयोगशाळा व भारतीय उद्योगांनी यामध्ये योगदान दिले आहे. भारत डायनॅमिक्स लिमिटेड, हैदराबाद आणि भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड, बेंगळुरू हे LRLACM साठी विकास आणि उत्पादन भागीदार आहेत, आणि ते मिसाईलचे विकास व एकत्रीकरण करण्यात गुंतले आहेत, असे DRDO ने स्पष्ट केले आहे.
यशस्वी प्रक्षेपणाबद्दल संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी DRDOचे अभिनंदन केले
“LRLACM हा संरक्षण संपादन परिषदेने मान्यता दिलेले मिशन मोड प्रकल्प आहे. हे ग्राउंडवरून मोबाइल आर्टिक्युलेटेड लॉन्चरच्या मदतीने तसेच युद्धनौकांवरून सार्वत्रिक उभ्या लॉन्च मॉड्यूल सिस्टीमद्वारे प्रक्षेपित करण्यासाठी तयार करण्यात आला आहे,” असे DRDO ने सांगितले. या यशस्वी प्रक्षेपणाबद्दल संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी DRDO ला अभिनंदन केले.
त्यांनी हे स्वदेशी क्रूझ मिसाईल विकास कार्यक्रमांना एक नवी दिशा देईल, असेही म्हटले. मूळ निःर्भय मिसाईलमध्ये शत्रूच्या रडारपासून बचाव करण्यासाठी अत्यंत कमी उड्डाण करण्याची क्षमता होती. LRLACM, अमेरिकेच्या टॉमहॉक क्रूझ मिसाईलप्रमाणेच, लांब पल्ल्याच्या लक्ष्यांवर मार करण्यासाठी भारतीय सशस्त्र दलाला एक नवीन सामर्थ्य देईल.
दुचाकी अपघातात युवकाचा मृत्यू |
न्या. निकम यांचा अंतरीम जामीन फेटाळला; तात्पुरत्या जामिनावर उद्या सुनावणी |
जीवे मारण्याचा प्रयत्न केल्या प्रकरणी पाच जणांवर गुन्हा |
100 रुपयांच्या कृत्रिम स्टॅम्प टंचाईबाबत भोगावकरांचा एल्गार |
सातारा जिल्ह्यातील धरणांतून सिंचनासाठी विसर्ग सुरू |
निर्यातक्षेत्रास प्रोत्साहन देण्यासाठी रोजगार निर्मिती कार्यशाळा संपन्न |
वेगवेगळ्या घटनांमध्ये दोन जण बेपत्ता |
अस्तित्व लपवल्याप्रकरणी एकावर गुन्हा |
युवतीचा विनयभंग केल्याप्रकरणी दोघांवर गुन्हा |
जुगार प्रकरणी एकावर कारवाई |
सार्वजनिक शांततेचा भंग केल्याप्रकरणी तीन जणांवर गुन्हा |
नुकसान प्रकरणी तीन जणांविरोधात गुन्हा |
विवाहितेस जाचहाट केल्याप्रकरणी पतीसह तीन जणांविरोधात गुन्हा |
दूध वाहतूक बंद करण्याचा स्वाभिमानीचा इशारा |
शिवसागर आणि धोम जलाशयात सी प्लेन सुविधा सुरू करावी |
निर्यातक्षेत्रास प्रोत्साहन देण्यासाठी रोजगार निर्मिती कार्यशाळा संपन्न |
वेगवेगळ्या घटनांमध्ये दोन जण बेपत्ता |
अस्तित्व लपवल्याप्रकरणी एकावर गुन्हा |
युवतीचा विनयभंग केल्याप्रकरणी दोघांवर गुन्हा |
जुगार प्रकरणी एकावर कारवाई |
सार्वजनिक शांततेचा भंग केल्याप्रकरणी तीन जणांवर गुन्हा |
नुकसान प्रकरणी तीन जणांविरोधात गुन्हा |
विवाहितेस जाचहाट केल्याप्रकरणी पतीसह तीन जणांविरोधात गुन्हा |
दूध वाहतूक बंद करण्याचा स्वाभिमानीचा इशारा |
शिवसागर आणि धोम जलाशयात सी प्लेन सुविधा सुरू करावी |
सहाय्यक निबंधक सहकारी संस्था सातारा यांना त्वरित निलंबित करण्यात यावे |
साक्षी कादबाने ब्रिटानिया इंडस्ट्रीजमध्ये व्यवस्थापकीय पदावर |
लाच मिळविण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी जिल्हा सत्र न्यायाधीशांसह चारजणांविरोधात तक्रार |
कोळेवाडी ग्रामसभेत मतपत्रिकेद्वारे मतदान घेण्याचा ठराव |
सर्वांना बरोबर घेऊन मलकापूरचा विकास करणार : आ. डॉ. अतुलबाबा भोसले |