सातारा : सातारा शहर पोलिसांनी अवैधरित्या दारु, ताडी विक्री केल्याप्रकरणी तीनजणांवर कारवाई केली आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, सातारा शहर परिसरात पोलिसांनी बेकायदा ताडी व दारु विक्रीप्रकरणी 3 गुन्हे दाखल केले. सदरबझार येथे ताडी प्रकरणी सागर गणपत अनपट (वय 39, रा. खेड फाटा, सातारा) याच्यावर शाहूपुरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला. पोलिसांनी त्याच्याकडून 900 रुपये किंमतीची ताडी जप्त केली.
दारु प्रकरणी दुसरा गुन्हा महिलेवर दाखल झाला आहे. अजंठा चौक, सातारा येथून पोलिसांनी 630 रुपये किंमतीच्या 18 दारुच्या बाटल्या जप्त केल्या. याप्रकरणी सातारा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.
तिसरा ताडी प्रकरणीचा गुन्हा महेश देविदास इनामदार (वय 53, रा. गडकरआळी, सातारा) याच्यावर शाहूपुरी पोलीस ठाण्यात दाखल झाला आहे. पोलिसांनी त्याच्याकडून 780 रुपये किंमतीची 13 लिटर ताडी जप्त केली आहे.