सातारा : शहरातील मंगळवार पेठ परिसरातून २१ वर्षीय युवती बेपत्ता झाल्याची तक्रार शाहूपुरी पोलिस ठाण्यात दाखल करण्यात आली आहे. मेहेक अब्दुल शेख (वय २१, रा. ५०७, मंगळवार पेठ, सातारा) ही दि. १५ रोजी सायंकाळी साडेसहा वाजण्याच्या सुमारास कामावरून कोणालाही काही न सांगता निघून गेली असून, अद्याप ती घरी परतली नसल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे.
याबाबत युवतीची आई नीलफोर अब्दुल शेख (वय ४०, रा. मंगळवार पेठ, सातारा) यांनी शाहूपुरी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. अधिक तपास पोलीस नाईक करपे करीत आहेत.