लिंब फाटा येथे बंद घर फोडून दागिने व रोख रक्कम चोरी; अज्ञाताविरुद्ध गुन्हा

by Team Satara Today | published on : 13 May 2026


सातारा : लिंब फाटा येथे बंद घर फोडून दागिने व रोख रक्कम चोरी केल्याची घटना उघडकीस आली आहे. ही चोरी ४ मे रोजी सायंकाळी साडेदहा ते ११ मे रोजी सकाळी दहा वाजण्याच्या दरम्यान घडल्याचा अंदाज आहे.

याप्रकरणी बबन बाळू साळुंखे (वय ७५, रा. लिंब फाटा, ता. जि. सातारा) यांनी फिर्याद दिली आहे. अज्ञात चोरट्याने घराच्या दरवाजाचे कुलूप तोडून आत प्रवेश केला. घरातील लोखंडी कपाटातील लॉकर उघडून सुमारे ६० हजार रुपयांचे सोन्या–चांदीचे दागिने व रोख रक्कम लबाडीने चोरून नेल्याचे फिर्यादीत नमूद आहे.

घटनेची माहिती मिळताच पोलीस निरीक्षक तांबे यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. अज्ञात आरोपीविरुद्ध तालुका पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास पोलीस कॉन्स्टेबल शिंदे करीत आहेत.


लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
गोडोली येथे मुलांच्या खेळण्यावरून वादातून महिलेशी गैरवर्तन; शहर पोलिसांत विनयभंगाची फिर्याद
पुढील बातमी
नाशिक त्र्यंबकेश्वर सिंहस्थ कुंभमेळा बोधचिन्हाचे मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्री आणि मान्यवरांच्या हस्ते अनावरण

संबंधित बातम्या