सातारा : शुक्रवार दि. 22 ते रविवार 24 मे दरम्यान सातारा नगरपरिषद सातारा आयोजित राज्यस्तरीय दादा महाराज करंडक श्री शाहू कलामंदिर येथे उत्साहात आणि प्रेक्षकांच्या भरघोस प्रतिसादात पार पडला. कलादर्शन व कलाशृंगार पुणे यांनी सादर केलेल्या 'तिळगूळ घ्या गोडबोले' या एकांकिकेने प्रथम क्रमांकाचे पारितोषिक पटकावले. यात रोख रु. 51000/- व करंडक यांचा समावेश होता.
स्पर्धेतील विविध एकांकिकांमधून सामाजिक प्रश्न, मानवी नातेसंबंध, ग्रामीण वास्तव, युवकांचे प्रश्न आणि बदलती जीवनशैली यांचे प्रभावी चित्रण करण्यात आले. संपूर्ण स्पर्धेमध्ये अनेक दर्जेदार एकांकिका सातारकर नाट्य रसिकांना मोफत पाहायला मिळाल्या. या स्पर्धेमध्ये सहभागी संघाना नाश्ता आणि जेवण, तसेच स्टेज वरील प्रॉपर्टी, लाइट व्यवस्था इत्यादी पूर्णत: मोफत सातारा नगरपरिषदेने उपलब्ध करून दिले होते. अशा प्रकारची मोफत सेवा देणारी बहुदा महाराष्ट्रातील ही एकमेव स्पर्धा असू शकेल अशी भावना यावेळी सहभागी संघातील अनेक कलाकारांनी बोलून दाखविली.
सातारा लोकसभा मतदार संघाचे लोकप्रिय खासदार उदयनराजे भोसले, सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले, नगराध्यक्ष अमोल मोहिते, उपनगराध्यक्ष डी. जी. बनकर, कला, क्रीडा आणि सांस्कृतिक समिति प्रमुख शंकर किर्दत, नगरपरिषदेचे मुख्याधिकारी विनोद जळक तसेच सर्व नगरसेवक-नगरसेविका यांच्या सहकार्यामुळे या स्पर्धा घेण्यात येतात.
सातारा नगरपरिषद सातारा आणि सातारा रंगकर्मी यांच्या संयोजनातून गेली दहा वर्षे सलगपणे यशस्वीरीत्या श्रीमंत छ. प्रतापसिंहराजे भोसले उर्फ दादा महाराज करंडक एकांकिका स्पर्धांचे आयोजन केले जाते. यावर्षी राज्यभरतून 28 संघांनी आपला सहभाग नोंदविला. स्पर्धा अतिशय उत्साहात आणि प्रेक्षकांच्या भरघोस प्रतिसादात पार पडली. स्पर्धेच्या परिक्षणाची जबाबदारी प्रमोद अत्रे, आशीर्वाद मराठे आणि सलीम मुल्ला या मान्यवरांनी पाहिली. स्पर्धेचा पारितोषिक वितरण समारंभ मान्यवर परीक्षक तसेच सातारकर रंगकर्मी यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी सूत्रसंचालन हेरंब जोशी यांनी केले. प्रास्ताविक स्पर्धा प्रमुख आणि माजी नगरसेवक कल्याण राक्षे यांनी केले तर निकाल वाचन संदीप जंगम यांनी केले.
स्पर्धेचा अंतिम निकाल खालीलप्रमाणे....
सर्वोत्कृष्ट एकांकिका - प्रथम - तिळगूळ घ्या गोडबोले, (कलादर्शन व कलाशृंगार, पुणे) , द्वितीय - घर घर, (सोहम प्रॉडक्शन, कोल्हापूर), तृतीय - किचकवध पुन्हा (उ.घ. ठाकूर कला महाविद्यालय, पनवेल), उत्तेजनार्थ प्रथम - ग्वाही (ऊ.ठ.घ. उेश्रश्रशसश ेष उेााशीलश, कोल्हापूर), उत्तेजनार्थ द्वितीय - बात हो ना हो (कलाकार मंडळी, पुणे), स्थानिक विशेष उल्लेखनीय - मेड फॉर इच अदर (संवाद नाट्यसंस्था, सातारा)
सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक - प्रथम - विनोद रत्ना (तिळगूळ घ्या गोडबोले), द्वितीय - प्रमोद पुजारी (घर घर), तृतीय - प्रणव शेंडगे (कीचकवध पुन्हा)
सर्वोत्कृष्ट अभिनेता - प्रथम - अमेय राजमाने, (तिळगूळ घ्या गोडबोले), द्वितीय - अभिषेक हीरेमठ स्वामी (ग्वाही), तृतीय- प्रमोद पुजारी (घर घर),
उत्तेजनार्थ - बद्रिश कट्टी (बात हो ना हो), दिव्येश इंदलकर (चित्ता), जितेंद्र माने (कीचकवध पुन्हा), दिपक माणगावकर (प्रेम की यातना), सुमित सांघमित्र (तिळगूळ घ्या गोडबोले),
सर्वोत्कृष्ट अभिनेत्री - प्रथम - शर्वरी लहाणे (तिळगूळ घ्या गोडबोले), द्वितीय - शांभवी धामणीकर (बात हो ना हो), तृतीय - अक्षता बारटक्के (ग्वाही), उत्तेजनार्थ - मानसी बोलूरे (नकाब), सायली वल्ली (झिम पोरी झिम), साक्षी कदम (सेक्स ऑन द व्हीला), भूमी कोळी (कीचकवध पुन्हा), सायली कामत (तिळगूळ घ्या गोडबोले)
सर्वोत्कृष्ट बालकलाकार - प्रथम- देवराज गांधी (झिम पोरी झिम), द्वितीय - दूर्वा कुंभार (सेक्स अँड व्हिलेज)
सर्वोत्कृष्ट प्रकाश योजना -प्रथम - पार्थ घोरपडे (घर घर), द्वितीय-- रोहित देशमुख (कीचक वध पुन्हा), तृतीय- पार्थ घोरपडे (नकाब)
सर्वोत्कृष्ट नेपथ्य - प्रथम - सोहम चव्हाण (घर घर), द्वितीय - रीतूपर्णा कितोनिया। आर्यन अन्सारी (कीचकवध पुन्हा), तृतीय- ओंकार वडके / महेश चौघूले (ग्वाही)
सर्वोत्कृष्ट पार्श्वसंगीत - प्रथम - अखिलेष, सुशांत, पियूष (कीचकवध पुन्हा), द्वितीय - परितोष ठाकुर (बात हो ना हो), तृतीय - अथर्व वाघ (झिम पोरी झिम)
सर्वोत्कृष्ट रंगभूषा व वेशभूषा - प्रथम - दिक्षिता पाटील, अनामिका कांबळे, जान्हवी नाळे (कीचकवध पुन्हा), द्वितीय- मोहीत इंगळे, राहूल तायडे (म्हव उटलाय),
तृतीय - समृद्धि कुलकर्णी, ऋजुता लिमये (झिम पोरी झिम) तर सर्वोत्कृष्ट नवीन संहितेचा मान राजीव मुळये यांच्या किचकवध पुन्हा या एकांकिकेला प्राप्त झाला.